सत्तेसाठी राजपक्षे यांनी केला बंडाचा प्रयत्न !

By admin | Published: January 12, 2015 12:06 AM2015-01-12T00:06:10+5:302015-01-12T00:06:10+5:30

श्रीलंकेचे माजी पराभूत अध्यक्ष महिंद राजपक्षे यांनी सत्तेला चिकटून राहण्यासाठी निवडणुकीतील पराभवाचा अंदाज येताच लष्कराच्या मदतीने बंड करण्याचा प्रयत्न केला होता,

Rajapaksa tried to rebel the power! | सत्तेसाठी राजपक्षे यांनी केला बंडाचा प्रयत्न !

सत्तेसाठी राजपक्षे यांनी केला बंडाचा प्रयत्न !

Next

कोलंबो : श्रीलंकेचे माजी पराभूत अध्यक्ष महिंद राजपक्षे यांनी सत्तेला चिकटून राहण्यासाठी निवडणुकीतील पराभवाचा अंदाज येताच लष्कराच्या मदतीने बंड करण्याचा प्रयत्न केला होता, असे उघड झाले असून, या घटनेची चौकशी करण्याचे आदेश नव्या सरकारने दिले आहेत.
नव्या सरकारकडून सर्वात आधी माजी अध्यक्ष राजपक्षे यांच्या बंडाची, तसेच कटकारस्थानाची चौकशी केली जाईल, असे नवे अध्यक्ष मैत्रीपला सिरीसेना यांच्या सरकारचे प्रवक्ते मंगला समरवीरा यांनी पत्रकारांना सांगितले.
लष्कर प्रमुख व पोलीस महानिरीक्षक यांनी राजपक्षे यांना साथ देण्यास नकार दिल्यानंतर राजपक्षे यांनी सत्ता सोडली. राजपाक्षे (६९) यांनी पराभव स्वीकारल्याबद्दल शुक्रवारी त्यांची प्रशंसा होत होती. मतमोजणीची अखेरची फेरी पूर्ण होण्याआधीच त्यांनी पराभव मान्य केला होता. राजपक्षे यांनी मुदत संपण्याआधीच निवडणूक जाहीर केली होती. हे सत्तांतर शांततेने झाले असे लोकांना वाटत आहे; पण सत्य वेगळेच आहे असे समरवीरा यांनी म्हटले.
पोलीस महानिरीक्षक इलांगकून यांनी या कटात सहभागी होण्यास नकार दिला. लष्कर प्रमुखांनी पोलिसांच्या बाजूने राहण्याचा निर्णय घेतला. अ‍ॅटर्नी जनरल यांनी या चालीचे घातक परिणाम होतील असा इशारा दिला होता, असे समरवीरा म्हणाले.
नवे अध्यक्ष सिरीसेना यांचे मुख्य प्रवक्ते रजिथा सेनारत्ने यांनी याआधी दिलेल्या माहितीनुसार राजपक्षे यांनी पराभवाचा अंदाज येताच लष्कर प्रमुख लेफ्ट. जनरल दया रत्ननायके यांच्यावर सैनिक तैनात करण्यासाठी दबाव आणला; पण त्यांनी कोणतेही बेकायदेशीर कृत्य करण्यास नकार दिला. अखेर कोणताही पर्याय न राहिल्याने राजपक्षे यांनी सत्ता सोडली व पराभव मान्य केला.
लष्कर प्रमुख, पोलीस महानिरीक्षक व निवडणूक आयुक्त यांनी दाखविलेले धैर्य व ठाम विचार याबद्दल आम्ही त्यांची प्रशंसा करतो, असे सेनारत्ने यांनी सांगितले. त्यांनी मुक्त व निर्भय निवडणुकीची लोकशाही परंपरा कायम ठेवली, असे सेनारत्ने म्हणाले.
राजपक्षे यांचा दावा
राजपक्षेंच्या प्रवक्त्याने हा आरोप निराधार असल्याचा दावा केला असून असे काही घडलेच नाही असे म्हटले आहे. ९ जानेवारी रोजी दुपारी ३.३० वाजता मतमोजणी चालू असताना अध्यक्ष राजपक्षे यांनी आढावा घेतला व निकाल काय येतील याचा अंदाज घेतला, असे मोहन समरनायके यांनी म्हटल्याचे बीबीसीने म्हटले आहे. त्यानंतर त्यांनी सर्व सचिवांना आदेश देऊन सत्तांतराचे आदेश दिले. ज्या राजकीय नेत्याने हे आरोप केले आहेत, त्यांना निराधार आरोप करण्याची सवय आहे, असे त्यांनी म्हटले आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: Rajapaksa tried to rebel the power!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.