राजीव गांधींच्या आठवणी जागवल्या,टाइपरायटर ते कॉम्प्युटर; अशी झाली देशात सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2017 04:42 AM2017-09-22T04:42:10+5:302017-09-22T04:42:12+5:30
भारतीयांना नवे विचार स्वीकारण्यासाठी वेळ लागतो. पण, नवे विचार, तंत्रज्ञान ते लगेच आत्मसात करतात, असे सांगताना, काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांनी कार्यालयात कॉम्युटरवरील कामकाजाची सुरुवात केली, तेव्हा त्यांना मोठ्या विरोधाला सामोरे जावे लागले होते, याची आठवण करून दिली.
न्यू यॉर्क : भारतीयांना नवे विचार स्वीकारण्यासाठी वेळ लागतो. पण, नवे विचार, तंत्रज्ञान ते लगेच आत्मसात करतात, असे सांगताना, काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांनी कार्यालयात कॉम्युटरवरील कामकाजाची सुरुवात केली, तेव्हा त्यांना मोठ्या विरोधाला सामोरे जावे लागले होते, याची आठवण करून दिली.
अमेरिकेत आपल्या समर्थकांसमोर राहुल म्हणाले की, आपले वडील राजीव गांधी कार्यालयात टाइपरायटरच्या जागी कॉम्युटर आणू इच्छित होते. तेव्हा त्यांच्या कर्मचाºयांनी आम्हाला कॉम्प्युटर नको, आम्ही टाइपरायटरवरच काम करू, असे त्यांना सांगितले. त्या वेळी सॅम पित्रोदा आणि वडिलांनी त्यांना टाइपरायटरच्या ठिकाणी आपण एक महिन्यासाठी कॉम्प्युटर ठेवू आणि एक महिन्यानंतर पुन्हा टाइपरायटर परत देऊ, असे त्यांना सांगितले. एका महिन्याने राजीव गांधी यांनी कर्मचाºयांना टाइपरायटर परत दिले, तेव्हा ते आम्हाला कॉम्प्युटरवरच काम करायचे आहे, असा आग्रह धरू लागले. राहुल म्हणाले की, भारतात नवे विचार स्वीकारायला वेळ लागतो. पण ते चांगले आहेत, असे लक्षात
येताच भारतीय अतिशय वेगाने
ते स्वीकारतात. त्या तंत्रज्ञानाचा
वापर चांगल्या पद्धतीने कसा
होऊ शकतो, हेही ते जगाला दाखवून देतात. (वृत्तसंस्था)