राजनाथ सिंहाना पाकिस्तानात पाऊल ठेवू देणार नाही - हाफीझ सईद
By admin | Published: August 1, 2016 12:10 PM2016-08-01T12:10:53+5:302016-08-01T12:36:16+5:30
केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या पाकिस्तान दौ-याच्या पार्श्वभूमीवर दहशतवादी हाफीझ सईदने पाकिस्तान सरकारला इशारा दिला आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
इस्लामाबाद, दि. १ - केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या पाकिस्तान दौ-याच्या पार्श्वभूमीवर दहशतवादी हाफीझ सईदने पाकिस्तान सरकारला इशारा दिला आहे. भारताचे गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानात पाऊल टाकले तर आपली जमात उद दावा संघटना देशभरात तीव्र निदर्शने करेल असे हाफीझने इशा-यामध्ये म्हटले आहे.
काश्मीरमध्ये झालेल्या मृत्यूंसाठी राजनाथ जबाबदार असल्याचा आरोप हाफीझ सईदने केला आहे. सार्क मंत्र्यांच्या परिषदेला उपस्थित रहाण्यासाठी राजनाथ सिंह पाकिस्तानला जाणार आहेत. राजनाथ यांचे स्वागत करुन पाकिस्तान सरकार काश्मीरी जनतेचा अपमान करणार आहे का ?. एकाबाजूला पाकिस्तानी जनता काश्मीरमध्ये सुरु असलेल्या हिंसाचाराचा निषेध करते तर, दुस-या बाजूला सत्ताधारी भारतीय गृहमंत्र्यांचे स्वागत करतात हे चांगलं नव्हे असे हाफीझने म्हटलं आहे.
सार्क मंत्र्यांच्या बैठकीसाठी राजनाथ सिंह तीन ऑगस्टला पाकिस्तानला जाणार आहेत. सईदने इस्लामाबाद, कराची, लाहोर, पेशावर, क्वेटा, मुल्तान, फैसलाबाद, मुझफ्फराबाद आणि अन्य शहरात निषेध मोर्चा काढणार असल्याचे म्हटले आहे. मुंबईवरील २६/११ दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार हाफीझ सईद समाजसेवेच्या नावाखाली पाकिस्तानात बसून भारत विरोधी दहशतवादी कारवायांमध्ये गुंतला आहे.