आशियाई देशांत रमजानला प्रारंभ
By admin | Published: June 30, 2014 12:48 AM2014-06-30T00:48:32+5:302014-06-30T00:48:32+5:30
आशिया खंडाच्या अधिकतर भागात पवित्र रमजान महिन्यातील रोजे धरण्यास सुरुवात झाली आहे.
Next
>जकार्ता : आशिया खंडाच्या अधिकतर भागात पवित्र रमजान महिन्यातील रोजे धरण्यास सुरुवात झाली आहे. इंडोनेशिया, मलेशिया, अफगाणिस्तान तथा अन्य आशियाई देशांत रमजानला प्रारंभ झाला आहे. इंडोनेशियात सुमारे 22.5 कोटी मुस्लिम लोकसंख्या आहे. इंडोनेशियात काही संघटनांकडून दारू जप्त करण्याची मागणी केली जात आहे. इस्लाम कॅलेंडरनुसार नववा महिना रमजानमध्ये मुस्लिम बांधव रोजा धरतात. रमजान महिना पूर्ण झाल्यानंतर ईद उल फित्र हा सण साजरा केला जातो.