राणा तहव्वूर फरार होण्याचा धोका नाही, अमेरिकेतील कोर्टात त्याच्या वकिलाची ग्वाही
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2020 03:41 AM2020-06-24T03:41:37+5:302020-06-24T03:41:45+5:30
कोरोनाचा संसर्ग झाल्याचे आढळल्यानंतर सहानुभूतीच्या आधारे त्याची अलीकडेच सुटका करण्यात आली होती.
वॉशिंग्टन : मुंबईतील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणा फरार होण्याचा धोका नाही, अशी ग्वाही देत त्याच्या वकिलाने त्याच्या सुटकेसाठी १५ लाख डॉलरचा जामीन देण्याची तयारी दाखविली. मूळचा पाकिस्तानी आणि कॅ नेडियन व्यावसायिक असलेला राणा तहव्वूर याचा २००८ मधील मुंबईतील दहशतवादी हल्ल्यात सहभाग असल्याने त्याला प्रत्यार्पित करण्यात यावे, या भारताच्या विनंतीनुसार राणाला लॉस एंजिलिसमध्ये पुन्हा अटक करण्यात आली होती. कोरोनाचा संसर्ग झाल्याचे आढळल्यानंतर सहानुभूतीच्या आधारे त्याची अलीकडेच सुटका करण्यात आली होती. तथापि, भारताने प्रत्यार्पणाची विनंती केल्यानंतर १० जून रोजी त्याला लॉस एंजिलिसमधून पुन्हा अटक करण्यात आली.
कॅलिफोर्निया जिल्हा मध्यवर्ती कोर्टाचे न्या. जॅकलीन चुलजिया यांनी राणा याच्या जामिनावरील (बॉण्ड) सुनावणी ३० जून रोजी ठेवली आहे.