आर्थिक संकटाच्या काळात श्रीलंकेचे पंतप्रधानपद स्वीकारणाऱ्या विक्रमसिंघेंचं भारताबाबत मोठं विधान, म्हणाले...  

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2022 10:39 PM2022-05-12T22:39:01+5:302022-05-12T22:39:31+5:30

Ranil Wickremesinghe News: देशावर आलेल्या सर्वात मोठ्या आर्थिक संकटादरम्यान, गुरुवारी रानिल विक्रमसिंघे यांनी श्रीलंकेचे २६ वे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. पंतप्रधान बनल्यानंतर विक्रमसिंघे यांनी भारतासोबतच्या संबंधांबाबत मोठं विधान केलं आहे.

Ranil Wickremesinghe, who accepted the post of Prime Minister of Sri Lanka during the financial crisis, made a big statement about India, saying ... | आर्थिक संकटाच्या काळात श्रीलंकेचे पंतप्रधानपद स्वीकारणाऱ्या विक्रमसिंघेंचं भारताबाबत मोठं विधान, म्हणाले...  

आर्थिक संकटाच्या काळात श्रीलंकेचे पंतप्रधानपद स्वीकारणाऱ्या विक्रमसिंघेंचं भारताबाबत मोठं विधान, म्हणाले...  

googlenewsNext

कोलंबो - देशावर आलेल्या सर्वात मोठ्या आर्थिक संकटादरम्यान, गुरुवारी रानिल विक्रमसिंघे यांनी श्रीलंकेचे २६ वे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. पंतप्रधान बनल्यानंतर विक्रमसिंघे यांनी त्यांचं प्राधान्य अर्थव्यवस्था सुरळीत करून देशाला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यास असेल, असं सांगितलं. त्यांनी भारताबरोबरच्या संबंधांबाबत सांगितलं की, आपल्या कार्यकाळात दोन्ही देशातील संबंध अधिक दृढ होतील, असे विक्रमसिंघे म्हणाले.

पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर विक्रमसिंघे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, मी अर्थव्यवस्थेच्या उत्थानाचे आव्हान स्वीकारले आहे. मी हे आव्हान अवश्य पूर्ण करेन, यावेळी त्यांना भारतासोबतच्या संबंधांबाबत विचारणा करण्यात आली. तेव्हा त्याबाबत विक्रमसिंघे म्हणाले की, दोन्ही देशांमधील संबंध हे आधीपेक्षा अधिक चांगले होतील.
 
रानिल विक्रमसिंघे देशातील सर्वात जुन्या पक्ष असलेल्या युनायटेड नॅशनल पार्टीचे नेते आहेत. चारवेळा त्यांनी श्रीलंकेचं पंतप्रधानपद भूषवलं आहे. मात्र २०२० मध्ये झालेल्या निवडणुकीत यूएनपीला एकही जागा जिंकता आली नाही. यूएनपीचा मजबूत बालेकिल्ला असलेल्या कोलंबो मतदारसंघातून विक्रमसिंघे यांनी निवडणूक लढवली होती. मात्र त्यांचा पराभव झाला. कम्युलेटिव्ह नॅशनल व्होटच्या आधारे यूएनपीला एक जागा देण्यात आली. त्या माध्यमातून विक्रमसिंघे संसदेत पोहोचले.

आतापर्यंत चारवेळी श्रीलंकेचे पंतप्रधान राहिलेल्या विक्रमसिंघे यांना ऑक्टोबर २०१८ मध्ये राष्ट्रपती मैत्रीपाला सिरिसेना यांनी पंतप्रधानपदावरून हटवलं. मात्र दोनच महिन्यांत त्यांनी पुन्हा पंतप्रधानपदाची सुत्रं हाती घेतली. आता त्यांना सत्ताधारी श्रीलंका पोदुजाना पेरामुना आणि विरोधी पक्ष असलेल्या समगी जन बालावेगायामधील एका गटासह अन्य अनेक पक्षांनी पाठिंबा दर्शवला आहे.

Web Title: Ranil Wickremesinghe, who accepted the post of Prime Minister of Sri Lanka during the financial crisis, made a big statement about India, saying ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.