खंडणी गोळा करणारा व्हायरस

By admin | Published: July 21, 2015 10:25 PM2015-07-21T22:25:33+5:302015-07-21T22:25:33+5:30

संगणकावर हल्ला करणारे व्हायरस संगणकातील माहिती चोरतात, संगणक खराब करतात, डेटा डिलीट करतात, त्यामुळे व्हायरस म्हटला,

Ransom collector virus | खंडणी गोळा करणारा व्हायरस

खंडणी गोळा करणारा व्हायरस

Next

सिंगापूर : संगणकावर हल्ला करणारे व्हायरस संगणकातील माहिती चोरतात, संगणक खराब करतात, डेटा डिलीट करतात, त्यामुळे व्हायरस म्हटला, की आपल्याला डोकेदुखी सुरू होते; पण फेब्रुवारी २०१५ पासून युरोप, अमेरिका व दक्षिण आशियात टेला स्क्रिप्ट नावाचा एक नवा व्हायरस कार्यान्वित झाला असून तो चक्क खंडणी मागतो. या व्हायरसमुळे डोके दुखून भागणार नाही, तर त्याचा निकाल लावल्याखेरीज पुढचे कामही करता येणार नाही.
आॅनलाईन खरेदी करणारे, गेमिंग व इतर व्यवसायासाठी संगणकाचा वापर करणाऱ्यांवर हा व्हायरस ई-मेलच्या अटॅचमेंटद्वारा हल्ला करतो व कॉम्प्युटरचा अ‍ॅक्सेस पूर्णपणे बंद करतो. जोपर्यंत व्हायरस निर्मात्यांनी मागितलेली खंडणी तुम्ही देत नाही, तोपर्यंत संगणक वापरता येत नाही. जर खंडणी देण्यास वेळ केला, तर खंडणीची रक्कम दुप्पट होते.
(वृत्तसंस्था)

Web Title: Ransom collector virus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.