अनेक वर्षांपासून फरार होता रेपचा आरोपी, लोकांना वाटलं मेला; कोरोना पॉझिटिव्ह झाल्यावर पकडला गेला
By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2022 01:03 PM2022-01-17T13:03:50+5:302022-01-17T13:17:53+5:30
Scotland : रॉसी स्कॉटलॅंडमध्ये एका काल्पनिक नावाने राहत असण्याबाबत समजलं होतं. आता त्याला ताब्यात घेण्यात आलं आहे
अमेरिकेतील एक व्यक्ती शिक्षा वाचवण्यासाठी आपल्या मृत्यूचं नाटक करून अनेक वर्षांपासून फरार होता. पण त्याला कोविड -१९ ची लागण झाल्याने त्याला स्कॉटलॅंडच्या एका हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावं लागलं. तेव्हा त्याची खरी ओळख समोर आली आणि तो पकडला गेला. यूटा काउंटी (Utah County) अटॉर्नी ऑफिसने सांगितलं की, निकोलस रॉसी (Nicholas Rossi) ज्याला निकोलस अलहवर्डियन (Nicholas Alahverdian) नावानेही ओळखलं जातं. त्याला २००८ मध्ये यूटामध्ये एका लैंगिक शोषण आणि २०१८ मध्ये ओहियोमध्ये एका हल्ल्याच्या आरोपात पोलीस शोधत होते. पण तो तेव्हापासूनच फरार होता.
कोरोनामुळे झाला त्याचा भांडाफोड
'डेली स्टार'च्या रिपोर्टनुसार, २९ फेब्रुवारी २०२० ला त्याच्या मृत्यूची घोषणा करण्यात आली होती. पण आता असा खुलासा झाला आहे की, तो फरार झाल्यावर आर्थर राइट नावाने ग्लासगोमध्ये राहत होता आणि नुकतंच त्याला कोरोनाची लागण झाल्यावर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं.
यूटा काउंटी अटॉर्नी कार्यालयाने सांगितलं की, 'रॉसी स्कॉटलॅंडमध्ये एका काल्पनिक नावाने राहत असण्याबाबत समजलं होतं. आता त्याला ताब्यात घेण्यात आलं आहे आणि यूटा काउंटी कार्यालयाने रॉसीला परत यूटामध्ये प्रत्यार्पित करण्यासाठी आंतरराष्ट्रीय एजन्सीसोबत काम सुरू आहे'.
प्रॉसिक्यूटरने सांगितलं की, रॉसी चौकशी आणि शिक्षेपासून वाचण्यासाठी अमेरिकेतून पळून गेला होता आणि इतर राज्यातील चौकशी समित्या व राज्याच्या पोलिसांना हा विश्वास देण्याचा प्रयत्न केला की, त्याचा मृत्यू झाला आहे'.
रॉसीच्या वकिलालाही झाला नाही विश्वास
रॉसीचे वकील जेफरी पाइन म्हणाले की, 'मी तुम्हाला खोटं सांगणार नाही. मला रॉसीचा मृत्यू संशयास्पद वाटला होता. पण तरीही मी त्याच्या पत्नीचं म्हणणं मानलं. मला हे म्हणून कुणाचाही अपमान करायचा नव्हता की, तो मेलेला नाही. म्हणून मी त्याची केस घेतली'.
हे पण वाचा :
मोदींना भेटताना असा शर्ट का घातला होता? राकेश झुनझुनवालांनी सांगितलं खरं कारण!