दहशतवाद्यांची फौज तयार करण्यासाठी केला बलात्कार

By Admin | Published: May 19, 2015 06:18 PM2015-05-19T18:18:28+5:302015-05-19T18:18:28+5:30

नायजेरियातील बोको हराम या दहशतवादी संघटनेच्या दहशतवाद्यांनी दहशतवाद्यांची नवीन फौज तयार करण्यासाठी स्थानिक महिलांवर बलात्कार केल्याची संतापजनक माहिती समोर आली आहे.

Rape is done to build an army of terrorists | दहशतवाद्यांची फौज तयार करण्यासाठी केला बलात्कार

दहशतवाद्यांची फौज तयार करण्यासाठी केला बलात्कार

googlenewsNext
ऑनलाइन लोकमत 
दलोरी, दि. १९ - नायजेरियातील बोको हराम या दहशतवादी संघटनेच्या दहशतवाद्यांनी दहशतवाद्यांची नवीन फौज तयार करण्यासाठी स्थानिक महिलांवर बलात्कार केल्याची संतापजनक माहिती समोर आली आहे. 
नायजेरियातील बोको हराम या दहशतवादी संघटनेच्या ताब्यातून अनेक महिलांची सुटका करण्यात आली असून या महिला सध्या विविध मदत शिबीरांमध्ये राहत आहेत. या महिलांनी त्यांच्यावरील अत्याचाराला वाचा फोडली असून अंगावर काटा आणणा-या या कहाणी ऐकून बोको हराम संघटनेचा विकृत चेहरा समोर येतो. २५ वर्षीय हमात्सू म्हणाली,  बोको हरामचे दहशतवादी स्थानिक महिलांचे अपहरण करुन एका बंद खोलीत डांबून ठेवायचे. त्या खोलीत अनेक महिला डांबून ठेवण्यात आल्या होत्या.  दररोज दहशतवादी एक गट यायचा व त्यांच्या पसंतीच्या महिलेला जबरदस्ती करत सोबत घेऊन जायचा. महिलेने विरोध करताच तिला बंदूकीचा धाक दाखवला जायचा असे तिने नमूद केले.  महिलांनी गर्भवती व्हावे हाच त्यांचा प्रमुख उद्देश होता, दहशतवाद्यांची नवीन फौज तयार करण्यासाठी ते महिलांवर बलात्कार करायचे असे एका पिडीतेने पाणावलेल्या डोळ्यांनी सांगितले. यातील काही दहशतवाद्यांनी दमदाटी करुन जबरदस्तीने महिलेसोबत लग्न केले आहे असे एका पिडीतेने स्थानिक प्रसारमाध्यमांना सांगितले. 
नायजेरियातील मैदुगिरी येथे मदत शिबीर सुरु करण्यात आले असून या केंद्रात तब्बल २०० हून अधिक महिला गर्भवती असल्याचे आढळले आहे.  धक्कादायक बाब म्हणजे आता या केंद्रात शरण घेतलेल्या एका महिलेला एचआयव्ही झाल्याचे निष्पन्न झाले असून बोको हरामच्या दहशतवाद्याकडूनच तिला या रोगाची लागण झाल्याचा संशय आहे.   

 

Web Title: Rape is done to build an army of terrorists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.