रोहिंग्या महिलांवर जवानांचा बलात्कार , म्यानमारमधील २१ महिलांची व्यथा, बांग्लादेशातील शिबिरांमध्ये आश्रय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 11:49 PM2017-12-11T23:49:49+5:302017-12-11T23:50:00+5:30
म्यानमारच्या सशस्त्र दलातील जवानांनी २१ रोहिंग्या महिलांवर बलात्कार केल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. बांग्लादेशात निर्वासितांच्या शिबिरात सध्या या महिला आश्रयाला आहेत. या महिलांनीच ही व्यथा मांडली आहे.
उखिया (बांग्लादेश) : म्यानमारच्या सशस्त्र दलातील जवानांनी २१ रोहिंग्या महिलांवर बलात्कार केल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. बांग्लादेशात निर्वासितांच्या शिबिरात सध्या या महिला आश्रयाला आहेत. या महिलांनीच ही व्यथा मांडली आहे.
तथापि, म्यानमारच्या सैन्याने मात्र असे काही झालेच नसल्याचे स्पष्ट केले आहे. एका १३
वर्षाच्या मुलीने सांगितले की, म्यानमारच्या सैन्याची दडपशाही आम्ही अनुभवली आहे. या सैैनिकांनी माझ्या वडिलांची हत्या केली.
या सैन्याने कसे अत्याचार केले ते या मुलीने सांगितले. अन्य एका महिलेची व्यथाही अशीच आहे. जूनमध्ये हे दाम्पत्य घरी झोपी गेले असताना सात सैनिक आले आणि त्यांनी या पुरुषाला दोरीने बांधले आणि त्याच्यासमोरच महिलेवर बलात्कार केला.
या सैन्याने महिलांवर अतिशय क्रूरपणे अत्याचार केले. अगदी
कमी वयाच्या मुली आणि गर्भवतींवरही या सैन्याने अत्याचार केल्याचे समोर येत आहे. अशा
किमान २१ महिला बांग्लादेशातील विविध निर्वासित शिबिरांमध्ये
आहेत. अशा महिलांची संख्या अधिकही असू शकेल, असा अंदाज आहे. (वृत्तसंस्था)
अंगावर शहारे : बांग्लादेशात आश्रयाला असलेल्या या महिलांच्या चेहºयावर आजही ती भीती दिसत आहे. रात्री अपरात्री हे सैनिक येऊन घरच्या पुरुषाला बांधून टाकत असत किंवा त्याची हत्या करत आणि महिलांवर अत्याचार करत होते. या महिला आणि त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितलेल्या व्यथा अंगावर शहारे आणणाºया आहेत. घरच्या कर्त्या पुरुषाला झाडाला बांधून मारणे, लहान मुलांनाही मारहाण करणे आणि महिलांवर अत्याचार करण्याची त्यांची पद्धत धडकी भरविणारी होती.