पाकिस्तानात रॉचे ऑपरेशन सुरुय, खलिस्तानी दहशतवाद्याच्या हत्येवरून पाक सैन्याच्या निवृत्त मेजरचे आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2023 04:43 PM2023-05-14T16:43:12+5:302023-05-14T16:46:56+5:30
६ मे रोजी खलिस्तानी कमांडो फोर्सचा फरार प्रमुख परमजीत सिंह पंजवारची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. यानंतर काही तासांतच माजी मेजरने हे खुलासे केले आहेत.
इस्लामाबाद: पाकिस्तानचे मंत्री बिलावल भुट्टो भारत दौऱ्यावर असताना पंजवार या खलिस्तानी दहशतवाद्याची लाहोरमध्ये हत्या करण्यात आली होती. यावरून भारताची एजन्सी रॉने आपले ऑपरेशन सुरु केल्याचा आरोप पाकिस्तानी सैन्याच्या माजी मेजरने केल्याने खळबळ उडाली आहे. आदिल फारुक राजा याने युट्युबवर व्हिडीओद्वारे आयएसआयवर पंजवारची सुरक्ष न करू शकल्यावरून टीका केली आहे.
पाकिस्तानी सैन्य आणि आयएसआय खलिस्तानी दहशतवाद्यांना पैसे पुरवत असल्याचेही त्याने मान्य केले आहे. पाकिस्तानी सैन्य भारतात ड्रग्ज आणि खोट्या नोटा पोहोचवणाऱ्यांना वाचवत आहे, असे त्याने म्हटले आहे. ६ मे रोजी खलिस्तानी कमांडो फोर्सचा फरार प्रमुख परमजीत सिंह पंजवारची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. यानंतर काही तासांतच माजी मेजरने हे खुलासे केले आहेत.
लाहोरमध्ये पंजवारसोबत सुरक्ष रक्षक होते, तरी देखील त्याला गोळ्या झाडण्यात आल्या. या हत्येला भारताची गुप्तचर यंत्रणा ऱॉने घडविले आहे, असे त्याने म्हटले आहे. 'द संडे गार्जियन लाइव' ने आपल्या वृत्तात म्हटले आहे की, त्याला जेवढी फंडिंग केली जात होती, त्याच्या बदल्यात तो काही करत नव्हता. यामुळे फंडिंग करणाऱ्या लोकांनी त्याची हत्या केली.
रॉ पाकिस्तानात लाहौरमध्ये येऊन ऑपरेशन करत आहे. हे लेफ्टनंट जनरल नदीम अंजुम आणि जनरल असीम मुनीर यांचे अपयश आहे. जो व्यक्ती भारतात वाँटेड होता, त्याला पाकिस्तानात शरण देता नये होती. आता दिलीय तर त्याचे संरक्षण करायला हवे होते. परंतू, तुम्ही राजकारणात गुंतलेले आहात. त्याला दोन बंदुकधारी मिळाले होते. त्यांनी प्रत्युत्तरात एका हल्लेखोराला मारले तर दुसऱ्य़ाला जखमी केले आहे, असे आदिल फारुक राजा म्हणाला.
बिलावल भुट्टो भारतात गेले असताना पंजवार याच्यावर गोळी झाडण्यात आली होती. बिलावलच्या आई बेनझीर भुट्टो भारतात आल्या तेव्हा खलिस्तान चळवळीची योजना लीक केली होती. पंजाबमधील खलिस्तानच्या तयारीची संपूर्ण यादी भारताला देण्यात आली होती. हा देखील टेबलाखालचा सौदा आहे का कुणास ठाऊक, असा संशयही त्याने व्यक्त केला आहे.