‘ई-मेल’चे जनक रेमण्ड यांचे निधन

By admin | Published: March 7, 2016 11:17 PM2016-03-07T23:17:26+5:302016-03-07T23:17:26+5:30

ई-मेल’ची ५७ वर्षांपूर्वी मुहूर्तमेढ रोवून अत्यंत वेगवान अशा क्रांतिकारी संदेशवहन पर्वाचा मार्ग प्रशस्त करणारे प्रतिभावंत तंत्रज्ञ रेमण्ड टॉमलिन्सन यांचे वयाच्या ७४ व्या वर्षी निधन झाले.

Raymond, the father of e-mail, died | ‘ई-मेल’चे जनक रेमण्ड यांचे निधन

‘ई-मेल’चे जनक रेमण्ड यांचे निधन

Next

न्यूयॉर्क : आज जगात खासगी अथवा व्यावसायिक संदेशवहनासाठी सर्रासपणे वापरल्या जाणाऱ्या ‘ई-मेल’ची ५७ वर्षांपूर्वी मुहूर्तमेढ रोवून अत्यंत वेगवान अशा क्रांतिकारी संदेशवहन पर्वाचा मार्ग प्रशस्त करणारे प्रतिभावंत तंत्रज्ञ रेमण्ड टॉमलिन्सन यांचे वयाच्या ७४ व्या वर्षी निधन झाले.
लिंकन, मॅसॅच्युसेट््स येथील राहत्या घरी रे टॉमलिन्सन यांचे शुक्रवारी, बहुधा हृदयविकाराने, निधन झाले असावे, असे वृत्त प्रसिद्धीमाध्यमांनी दिले. त्यांच्या कुटुंबियांपैकी कोणाशीही संपर्क होऊ शकला नाही. रेमण्ड सध्या जेथे नोकरीस होते त्या रेथेआॅन कंपनीने एक निवेदन प्रसिद्ध करून त्यांच्या निधनाची माहिती दिली. आजच्या स्वरूपातील ई-मेलची मुहूर्तमेढ रेमण्ड टॉमलिन्सन यांनी १९७१ मध्ये रोवण्यापूर्वीही संगणकांच्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक संदेशांची देवाणघेवाण करण्याचे अगदी प्राथमिक स्वरूपातील तंत्र अस्तित्वात होते. त्ंयावेळी व्यक्तिगत संगणक नव्हते. त्यामुळे एका मर्यादित नेटवर्कमध्ये अनेकांना सामायिक स्वरूपाचा संदेश पाठविणे शक्य होत असे. रेमण्ड यांनी हे तंत्र आणखी प्रगत केले व जगाच्या पाठीवरील कोट्यवधी लोकांना गोपनीय पद्धतीने व्यक्तिगत पातळीवर संदेशाची देवाणघेवाण करणे शक्य झाले. (वृत्तसंस्था)
> ‘@’ ची देणगी
प्रत्येकाचा ई-मेल अ‍ॅड्रेस लिहिण्याची ठराविक पद्धत जगन्मान्य झाली आहे. त्यात सुरुवातीस युजरनेम व नंतर त्याचा पत्ता अशी रचना असते. या दोन्हींच्या मध्ये ‘@’ हे चिन्ह सर्वप्रथम वापरण्याचे श्रेयही टॉमलिन्सन यांच्याकडेच जाते.
> जगाच्या संदेशवहन क्षेत्रात रेमण्ड टॉमलिन्सन यांनी क्रांती घडवून आणली. एवढी महान कामगिरी करूनही ते नेहमीच विनम्र, दयाळू आणि उमदादिल राहिले.
-माईक डोबल, प्रवक्ते, रेथेआॅन कंपनी
रेमण्ड यांचे निधन झाल्याची बातमी अत्यंत दु:खद आहे.
-व्हिंटन सेर्फ, इंटरनेटचे एक प्रणेते
रे टॉमलिन्सन,ई-मेलचा शोध लावल्याबद्दल व ‘@’ हे चिन्ह जगाच्या नकाशावर आणल्याबद्दल आम्ही ऋणी आहोत.
-जीमेलची टष्ट्वीटरवर श्रद्धांजली

Web Title: Raymond, the father of e-mail, died

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.