चष्म्याच्या काचेवर वाचा कोणत्याही भाषेतील मेसेज; अमेरिकेच्या स्टॅनफोर्ड विद्यापीठातील संशोधन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2023 07:19 AM2023-08-18T07:19:25+5:302023-08-18T07:20:05+5:30

कोणत्याही चष्म्यामध्ये या तंत्रज्ञानाचा वापर करता येईल. हे गॅजेट हलके असून, त्याचा वापर पूर्ण दिवस करता येईल.

read messages in any language on the glasses research at stanford university usa | चष्म्याच्या काचेवर वाचा कोणत्याही भाषेतील मेसेज; अमेरिकेच्या स्टॅनफोर्ड विद्यापीठातील संशोधन

चष्म्याच्या काचेवर वाचा कोणत्याही भाषेतील मेसेज; अमेरिकेच्या स्टॅनफोर्ड विद्यापीठातील संशोधन

googlenewsNext

वॉशिंग्टन: वेगाने बदलणारे तंत्रज्ञान लोकांच्या जीवनात मोठा बदल घडवू पाहत आहे. आता तो दिवस दूर नाही जेव्हा तुम्ही कमी खर्चात ट्रान्सक्राइबल काचेचा वापर करून कोणत्याही भाषेतील संदेश चष्म्याच्या काचेवर वाचू शकाल. हे तंत्रज्ञान पूर्वी अस्तित्वात असले तरी महागाईमुळे ते सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर होते. आता ट्रान्सकाइबल काच जवळपास आठ हजार रुपयांना मिळते.

हा कारनामा अमेरिकेच्या स्टॅनफोर्ड विद्यापीठाचे दोन विद्यार्थी माधव लवकरे आणि टॉम प्रित्स्की यांनी केला आहे. त्यांनी ट्रान्सक्राइबल ग्लास विकसित आणि डिझाइन केली आहे. कोणत्याही चष्म्यामध्ये या तंत्रज्ञानाचा वापर करता येईल. हे गॅजेट हलके असून, त्याचा वापर पूर्ण दिवस करता येईल. गॅजेटचे खास वैशिष्ट्य म्हणजे वापरकर्ते त्यांच्या इच्छेनुसार फाँटचा आकार आणि भाषा बदलू शकतील. यासह, तुम्ही ट्रान्सक्रिप्शन गोळा करण्यासाठी ॲप देखील वापरू शकता. वेगवेगळ्या भाषिक प्रदेशात काम करणाऱ्या व चित्रपटांचा आनंद लुटणाऱ्या लोकांसाठी हे गॅजेट फायदेशीर ठरेल.

बोललेले वाक्य शब्दात दिसणार

डिझाइन तयार केलेले गॅजेट कोणत्याही चष्म्याला जोडले जाऊ शकते. हे गॅझेट डिस्प्लेसह चष्म्याचे कॉम्पॅक्ट स्मार्ट चष्म्यात रूपांतर करते. हा डिस्प्ले डाव्या किंवा उजव्या डोळ्यासमोर ठेवता येतो. हे स्पीच-टू-टेक्स्ट रेकग्निशन तंत्रज्ञान वापरून कोणत्याही संभाषणाचे रिअल टाइम भाषेत रूपांतर करते. ज्या लोकांना ऐकण्यात अडचण येते त्यांच्यासाठी हे तंत्र खूप फायदेशीर आहे.


 

Web Title: read messages in any language on the glasses research at stanford university usa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.