‘तालिबान राजवटीस मान्यता देणे ही चूक’
By admin | Published: December 6, 2014 12:05 AM2014-12-06T00:05:03+5:302014-12-06T00:05:03+5:30
अफगाणिस्तानातील तालिबान राजवटीला पाकिस्तानने मान्यता दिली होती. पाकिस्तानची ही मोठी चूक होती, असे आता माजी लष्करशहा परवेझ मुशर्रफ म्हणत आहेत.
कराची : अफगाणिस्तानातील तालिबान राजवटीला पाकिस्तानने मान्यता दिली होती. पाकिस्तानची ही मोठी चूक होती, असे आता माजी लष्करशहा परवेझ मुशर्रफ म्हणत आहेत. अल काईदाचा उदय पाश्चिमात्य राष्ट्रांमुळे झाला, असा ठपकाही त्यांनी ठेवला आहे.
कराची येथे ते युथ पार्लमेंटमध्ये मुशर्रफ बोलत होते. अफगाणिस्तानात १९९६ ते २००१ या कालावधीत तालिबान राजवट होती. या राजवटीला मान्यता देणारा जगातील एकमेव देश म्हणजे पाकिस्तान होता. सौदी अरेबिया व अरब अमिरात यांनी सुरुवातीला तालिबान राजवटीला पाठिंबा दिला; पण नंतर तो मागे घेतला.
तालिबान राजवटीला पाठिंबा दिल्यानंतर १८ वर्षांनी मुशर्रफ यांनी तालिबानच्या क्रूर राजवटीला मान्यता देणे ही मोठी चूक ठरल्याचे मान्य केले आहे. अफगाणिस्तानवर सोविएत युनियनने आक्रमण केले होते. या आक्रमणाने जगातील राजकीय वातावरण बदलले. त्या काळात अमेरिकेने तीन महाचुका केल्या.
(वृत्तसंस्था)
रशियाने माघार घेतल्यानंतर अमेरिकेनेही माघार घेतली ही एक त्यातील चूक आहे, असे मुशर्रफ (७१) म्हणाले. पाकिस्तानात मुशर्रफ यांनी १९९९-२००८ पर्यंत सत्ता राबविली.
अमेरिकेच्या महाचुका
१) रशियाशी लढणाऱ्या २५ हजार अफगाण मुजाहिदीनांचे पुनर्वसन न करणे
२) तालिबानला संघटना म्हणून मान्यता न देणे. पाकिस्तानने तालिबान राजवटीला मान्यता दिल्यामुळे जगात पाकिस्तानची प्रतिमा नकारार्थी झाली.
३ ) अमेरिका व नाटो सैन्याने अफगाणिस्तानवर हल्ला केल्यामुळे तालिबान व इतर दहशतवादी डोंगराळ भागाकडे गेले.
तालिबानची निर्मिती अफगाणिस्तानातील परिस्थितीमुळे झाली. तालिबान हे पाकिस्तानचे पुत्र असल्याचा आरोप चुकीचा आहे, असेही मुशर्रफ यावेळी म्हणाले.