शाहरूख खानचा असाही विक्रम

By admin | Published: April 28, 2017 01:41 PM2017-04-28T13:41:40+5:302017-04-28T13:41:40+5:30

बॉलीवूडचा सुपरस्टार शाहरूख खान कॅनडामध्ये टेड टॉक्स (TED - Technology, Entertainment and Design Talks) या कॉन्फरन्समध्ये सहभागी होणार असून हा मान मिळवणारा

The record of Shah Rukh Khan's Asahi | शाहरूख खानचा असाही विक्रम

शाहरूख खानचा असाही विक्रम

Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 28 - बॉलीवूडचा सुपरस्टार शाहरूख खान कॅनडामध्ये टेड टॉक्स (TED - Technology, Entertainment and Design Talks) या कॉन्फरन्समध्ये सहभागी होणार असून हा मान मिळवणारा तो बॉलीवूडमधला पहिला कलाकार ठरला आहे. कॅनडामध्ये दरवर्षी हे संमेलन भरते आणि त्यामध्ये भविष्य कसं असेल याबद्दल तज्ज्ञ आपली मतं व्यक्त करतात.
टेड टॉक्स हे अत्यंत प्रतिष्ठेचं व्यासपीठ मानलं जातं. या आधी अमेरिकेचे माजी अध्यक्ष बिल क्लिंटन, मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स, अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस, गुगलचे संस्थापक सर्जी बिन व लॅरी पेज अशा दिग्गजांनी टेड टॉक्समध्ये आपले विचार मांडले आहेत. यंदा बॉलीवूडच्या सुपस्टारचे विचार ऐकण्यासाठी कॅनडामध्ये उत्सुकता लागली आहे. 
विशेष म्हणजे यंदा शाहरूखच्या बरोबरीने सेरेना विल्यम्सही प्रेरणादायी भाषण टेड टॉक्समध्ये करणार आहे. व्यासायिक पातळीवरही शाहरूख छोट्या पडद्यावर टेड टॉक्स इंडिया - नयी सोच या शोद्वारे पुन्हा अवतरणार आहे. त्याखेरीज अनुष्का शर्मासोबत दी रिंग या चित्रपटावर सध्या शाहरूख काम करत आहे. आलिया भटबरोबर आनंद रायच्या चित्रपटात शाहरूख झळकेल अशी चर्चाही सुरू आहे.

Web Title: The record of Shah Rukh Khan's Asahi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.