प्रदूषणामुळे चीनमध्ये रेड अलर्ट

By admin | Published: December 8, 2015 11:36 PM2015-12-08T23:36:46+5:302015-12-08T23:36:46+5:30

धुके आणि धूर (स्मोग) एक होऊन झालेले प्रदूषण बीजिंग शहराला धोकादायक बनले असून, प्रथमच येथील रहिवाशांसाठी अति सावधगिरी (रेड अलर्ट) बाळगण्यास सांगितले आहे.

Red alert in China due to pollution | प्रदूषणामुळे चीनमध्ये रेड अलर्ट

प्रदूषणामुळे चीनमध्ये रेड अलर्ट

Next

बीजिंग : धुके आणि धूर (स्मोग) एक होऊन झालेले प्रदूषण बीजिंग शहराला धोकादायक बनले असून, प्रथमच येथील रहिवाशांसाठी अति सावधगिरी (रेड अलर्ट) बाळगण्यास सांगितले आहे. दोन कोटी २० लाख लोकसंख्येच्या या शहरातील निम्म्या खासगी कार्स वापरण्यास बंधने घालण्यात आली असून, शाळा आणि बांधकामे बंद ठेवण्यात आली आहेत.
येथील सकाळची हवा ‘खूपच अनारोग्यकारी’ दर्जापासून ‘धोकादायक’ अवस्थेला पोहोचली. हवेत प्रदूषणकारी अतिसूक्ष्म कण २.५ पीएम होते. ते २.५ मायक्रोनपर्यंत गेले आणि हवेतील प्रदूषणकारी घटक मोजले तेव्हा ते सोमवारी २५६ पातळीवर होते ते मंगळवारी ३६५ झाले. (वृत्तसंस्था)

Web Title: Red alert in China due to pollution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.