मास्क वापरण्याचा सल्ला १९१८ मध्येही दिला होता
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2020 12:42 AM2020-10-05T00:42:23+5:302020-10-05T00:42:41+5:30
रेड क्रॉस सोसायटीने करून दिली आठवण
नवी दिल्ली : तोंडाला मास्क लावा, असा सल्ला आम्ही १९१८ मध्ये दिला होता व आता २०२० मध्येही देत आहोत, असे इंटरनॅशनल कमिटी आॅफ द रेड क्रॉस सोसायटीने म्हटले असून त्याकडे नेटिझन्सचे लक्ष वेधले आहे.
१९१८ मध्ये स्पॅनिश फ्लूची महामारी तर २०२० मध्ये कोरोनाची. सोसायटीने त्या इशाऱ्यात मास्क वापरणे किती गरजेचे आहे याचे महत्व सांगितले होते. सोसायटीने १०२ वर्षांपूर्वीच्या व सध्याच्या परिस्थितीतील साम्याकडेही लक्ष वेधले आहे.
रेड क्रॉसच्या अधिकृत टिष्ट्वटरवर प्रोफाईलवर ही पोस्ट त्या छायाचित्रासह दिली गेली आहे. ‘मास्क वापरा आणि तुमचे आयुष्य वाचवा’’ असे त्यात म्हटले आहे.
जे लोक मास्क वापरतात ते फक्त त्यांचेच नाही तर त्यांची मुले व शेजारच्यांचेही आयुष्य वाचवत असतात याचा तपशील त्या पीएसएमध्ये दिला गेला होता