अबब...! 68 सेकंदांत 'या' पठ्याने फस्त केल्या 50 झणझणीत मिरच्या
By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2018 10:48 AM2018-07-14T10:48:45+5:302018-07-14T10:52:47+5:30
काही लोकांसमोर मिरचीचे नाव काढले तरीदेखील ते तोंड वाकडे करतात. तर काही लोकांना जेवणासोबत मिरची लागतेच, नाहितर त्यांचे जेवण अपूर्ण रहाते. आपल्या जेवणात चुकून एखादी मिरची चावली तर चटकन डोळ्यांत पाणी येते.
काही लोकांसमोर मिरचीचे नाव काढले तरीदेखील ते तोंड वाकडे करतात. तर काही लोकांना जेवणासोबत मिरची लागतेच, नाहितर त्यांचे जेवण अपूर्ण रहाते. आपल्या जेवणात चुकून एखादी मिरची चावली तर चटकन डोळ्यांत पाणी येते. पण एका पठ्याने फक्त 68 सेकंदांमध्ये चक्क 50 झणझणीत लाल तिखट मिरच्या फस्त केल्या.
चीनमधील हुनान प्रांतामध्ये एका स्पर्धेमध्ये टँग शुआइहुई नावाच्या एका व्यक्तीने जवजवळ प्रतिसेंकद एक प्रमाणे 50 मिरच्या फस्त केल्या. त्याला बक्षीस म्हणून 24 कॅरेट सोन्याचा 3 ग्रॅमचे नाणे मिळाले आहे. या स्पर्धेमध्ये ठेवण्यात आलेल्या मिरच्या या मेक्सिकोतील होत्या. या मिरचीला टबॅस्को पेपर या नावाने ओळखले जाते. या मिरचीला जगातील सर्वात तिखट मिरच्यामध्ये गणले जाते. टँग शुआइहुई व्यतिरिक्त या स्पर्धेत अन्य 9 लोकांनी सहभाग नोंदवला होता. डॉक्टरांच्या उपस्थितीतच ही स्पर्धा घेण्यात आली होती.
काय आहे स्पर्धा -
चीनच्या हुनान भागात वार्षिक मिरची महोत्सव आयोजित करण्यात येतो. या महोत्सवात मिरची खाण्याची स्पर्धाही असते.
त्यात स्पर्धकांना 50 झणझणीत लाल मिरच्या दिल्या जातात. सर्वांत जलदगतीनं त्या खाणाऱ्याला बक्षीस म्हणून 24 कॅरेट सोन्याचे 3 ग्रॅमचे सोन्याचं नाणं दिलं जातं.
टबॅस्को मिरचीचे बद्दल -
आपल्याकडे कोल्हापूरची लवंगी मिरची सर्वात तिखट समजली जाते. पण लंवगी मिरचीच्या तुलनेत टबॅस्को मिरची कितीतरी पटींनी अधिक तिखट आहे. टबॅस्को मिरचीचे उत्पादन मेक्सिकोमध्ये घेण्यात येते. या मिरचीचा उपयोग खासकरून सॉस आणि सिरप तयार करण्यासाठी करण्यात येतो.