भारतीय सीमेजवळच्या सैन्य तुकडया कमी करा, अमेरिकेचा चीनला इशारा

By Admin | Published: May 14, 2016 04:06 PM2016-05-14T16:06:22+5:302016-05-14T16:06:22+5:30

चीन आपली संरक्षण सिद्धता वाढवत चालला असून, भारताला लागून असणा-या सीमेवर चीन सैनिकांची संख्या वाढू लागली आहे.

Reduce military borders near Indian border, America warns China | भारतीय सीमेजवळच्या सैन्य तुकडया कमी करा, अमेरिकेचा चीनला इशारा

भारतीय सीमेजवळच्या सैन्य तुकडया कमी करा, अमेरिकेचा चीनला इशारा

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत 

वॉशिंग्टन, दि. १४ - चीन आपली संरक्षण सिद्धता वाढवत चालला असून, भारताला लागून असणा-या सीमेवर चीन सैनिकांची संख्या वाढू लागली आहे. भारताची कोंडी करण्यासाठी चीनकडून उचलल्या जात असलेल्या या पावालांची अमेरिकेने गंभीर दखल घेतली आहे. अमेरिकेने चीनला भारतीय सीमेवरील  वाढती सैन्य संख्या कमी करण्यासाठी इशारा दिला आहे. 
 
जगाच्या विविध भागात लष्करी विस्तार करण्यावर चीनने लक्ष केंद्रीत केले आहे विशेष करुन पाकिस्तानी भूभागात चीनी सैन्याचा वावर मोठया प्रमाणात वाढला आहे. अमेरिकेचे चीनच्या या सर्व हालचालींवर बारीक लक्ष आहे. भारतीय सीमेजवळ चीन आपली सैन्य संख्या वाढवत असल्याचे आमच्या लक्षात आले आहे असे ईस्ट एशियाचे विषयाचे अब्राहम एम डेनमार्क यांनी सांगितले. 
 
चीनच्या लष्करी विस्तारासंबंधीचा एक वार्षिक अहवाल पेंटागॉनने अमेरिकन काँग्रेसला दिला आहे. चीनच्या या हालचालींमागचा नेमका उद्देश काय आहे त्याचा निष्कर्ष काढणे कठीण आहे असे डेन्मार्क यांनी सांगितले. आम्ही भारताबरोबर व्दिपक्षीय संबंध सुधारण्यावर भर दिला आहे. यामागे फक्त चीन एकमेव कारण नाही तर, भारत आमचा महत्वाचा सहकारी देश आहे. भारताच्या मुल्यांमुळे आमचे संबंध दृ्ढ होत आहेत असे डेन्मार्क यांनी सांगितले. 
 

Web Title: Reduce military borders near Indian border, America warns China

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.