पाकिस्तानकडून येत्या आर्थिक वर्षात स्वेच्छेने संरक्षण खर्चात कपात
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2019 03:44 AM2019-06-06T03:44:04+5:302019-06-06T03:44:19+5:30
इस्लामाबाद : आगामी आर्थिक वर्षात पाकिस्तान स्वेच्छेने संरक्षण खर्चात कपात करणार आहे. बिकट आर्थिक संकटाततून बाहेर येण्यासाठी करत असलेल्या ...
इस्लामाबाद : आगामी आर्थिक वर्षात पाकिस्तान स्वेच्छेने संरक्षण खर्चात कपात करणार आहे. बिकट आर्थिक संकटाततून बाहेर येण्यासाठी करत असलेल्या विविध उपाययोजनांपैकीच हा एक धक्कादायक निर्णय आहे.
पाकिस्तानी लष्कराच्या प्रसारमाध्यम विभागाचे प्रमुख मेजर जनरल असिफ गफूर यांनी एका टिष्ट्वटमध्ये ही माहिती दिली. त्यांनी म्हटले की, राष्ट्रीय सुरक्षेशी कोणतीही तडजोड न करता संरक्षण खर्चात कपात करणार आहे. ज्या शक्तींपासून देशाला धोका आहे त्यांचा मुकाबला करण्यास आम्ही सज्ज आहोत. संरक्षण खर्चात कपात केल्यानंतर तीनही दलांकरिता पुरेशा निधीची सोयी देशातील अन्य स्रोतांतून केली जाईल.
पंतप्रधान इम्रान खान यांनी मंगळवारी सांगितले की, देश संकटात असताना लष्कराने संरक्षण खर्चात कपात करण्याचा घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे. या कपातीतून उरणारा पैसा पाकिस्तानातील बलुचिस्तान व इतर अविकसित भागांचा कायापालट करण्यासाठी वापरला जाईल. दरम्यान, पाकिस्तान सरकार ११ जून रोजी अर्थसंकल्प सादर करणार आहे.