पाकिस्तानला मोठा धक्का, ट्रम्प यांचा तालिबान्यांशी चर्चा करण्यास नकार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2018 04:59 PM2018-01-30T16:59:15+5:302018-01-30T17:06:46+5:30

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तालिबान्यांशी बातचीत करण्यास नकार दिला आहे. भारतासाठी हे चांगले संकेत आहेत.

Refusal to talk to Pakistan with Taliban | पाकिस्तानला मोठा धक्का, ट्रम्प यांचा तालिबान्यांशी चर्चा करण्यास नकार

पाकिस्तानला मोठा धक्का, ट्रम्प यांचा तालिबान्यांशी चर्चा करण्यास नकार

Next

वॉशिंग्टन- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तालिबान्यांशी बातचीत करण्यास नकार दिला आहे. भारतासाठी हे चांगले संकेत आहेत. दहशतवाद्यांशी कोणत्याही प्रकारच्या चर्चेच्या भारत विरोधात आहे. तालिबान्यांशी चर्चा  करण्याच्या पाकिस्तान, चीन आणि रशियाच्या विरोधात आता अमेरिका उभा राहिला आहे. अफगाणिस्तानच्या विषयावर पाकिस्तान, चीन आणि रशिया भारताला सहभागी करून घेऊ इच्छित नाही. कारण भारत दहशतवाद्यांशी कोणत्याही प्रकारची चर्चा करायची नाही, या भूमिकेवर ठाम आहे.

तालिबाननं हिंसेचा मार्ग सोडून अफगाणिस्तानच्या संविधानाचा स्वीकार करून अल कायदाशी सर्व संबंध तोडले पाहिजेत. भारत याला रेड लाइन्स असे संबोधतो. तालिबाननं अफगाणिस्तानच्या अटी मान्य केल्या तरच त्यांच्याशी चर्चा शक्य आहे. तरीही याचा निर्णय अफगाणिस्ताननं केला पाहिजे. अफगाणिस्तानमध्ये गेल्या 16 वर्षांपासून अशांती पसरली आहे. विशेष म्हणजे अफगाणिस्तानही भारतासारखी रेड लाइन्स अटीसंदर्भात भूमिका आहे. तसेच अफगाणिस्तानमध्ये शांती नांदावी, अशी भारताची इच्छा आहे. 

तर दोन दिवसांपूर्वीच डोनाल्ड ट्रम्प यांनी तालिबान आणि हक्कानी नेटवर्कच्या सहा नेत्यांवर निर्बंध आणत पाकिस्तानला जबर हादरा दिला होता. पाकिस्तानने दहशतवादाविरुद्ध एकजुटीने काम करण्याचे वचन पाळत अतिरेक्यांना आश्रय आणि पैसा पुरविणे थांबवावे, यासाठीही अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दबाव वाढविला आहे. अब्दुल समद सानी, अब्दुल कादीर बासीर अब्दुल बासीर, हाफिज मोहम्मद पोपलजई आणि मौलवी इनायतुल्ला या तालिबानच्या चार तसेच हक्कानी नेटवर्कचे फाकिर मोहम्मद आणि गुला खान हामिदी अशा दोन प्रमुखांवर निर्बंध आणतानाच अमेरिकेच्या वित्त विभागाने त्यांना जागतिक दहशतवादी घोषित केले आहे.

हक्कानी नेटवर्क अफगाणिस्तानात अमेरिकन सैनिकांचे अपहरण आणि हल्ल्यांमध्ये गुंतला होता. भारताविरुद्धही त्याने घातक कारवाया केल्या आहेत. काबूलमध्ये 2008 साली भारतीय मिशनवर झालेल्या हल्ल्यात 58 लोक मारले गेले होते. नववर्षातील आपल्या पहिल्याच टि्वटमध्ये ट्रम्प यांनी पाकिस्तानवर खोटारडेपणाचा आणि अमेरिकेला धोका दिल्याचा आरोप केला होता. अमेरिकेने पाकिस्तानला दहशतवादाविरुद्ध लढण्यासाठी दिलेली मदत म्हणजे मूर्खपणा होय, असे विधानही त्यांनी केले.

अमेरिकेच्या अखत्यारित असलेल्या या सहाही दहशतवाद्यांची संपूर्ण संपत्ती जप्त केली जाणार असून, त्यांची अमेरिकन नागरिकांसोबतची आर्थिक देवाण-घेवाण थांबविली जाईल. अमेरिकन मित्र फौजांवरील हल्ले, तस्करी आणि अतिरेकी गटांचे आर्थिक पोषण करण्यात सहभागी असलेल्या तालिबान आणि हक्कानी नेटवर्कशी संलग्न सहा नेत्यांवर प्रतिबंध आणल्याची घोषणा दहशतवाद आणि वित्त गुप्तचर विभागाचे अवर सचिव सिगल मंडेलकर यांनी केली आहे.

Web Title: Refusal to talk to Pakistan with Taliban

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.