भाजप सत्तेत आहे तोपर्यंत संबंध सुधारणार नाहीत; माजी पंतप्रधान इम्रान खान यांचे वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2022 11:12 AM2022-11-23T11:12:46+5:302022-11-23T11:13:27+5:30
इम्रान म्हणाले की, दोन्ही देशांचे संबंध सुधारल्यास मोठा फायदा होईल. मात्र, जम्मू-काश्मीरबाबत भारताची भूमिका मुख्य अडसर असेल.
इस्लामाबाद : भारतासोबत चांगले संबंध हवे आहेत, असे पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी म्हटले आहे. दोन्ही देशांचे संबंध सुधारणे ही पाकिस्तानची गरज आहे. मात्र, जोपर्यंत भारतात भारतीय जनता पक्षाचे (भाजप) सरकार आहे, तोपर्यंत हे शक्य होणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे.
इम्रान म्हणाले की, दोन्ही देशांचे संबंध सुधारल्यास मोठा फायदा होईल. मात्र, जम्मू-काश्मीरबाबत भारताची भूमिका मुख्य अडसर असेल. मात्र, भाजप सरकार कट्टर आहे आणि त्यांचे मुद्दे राष्ट्रवादाशी संबंधित आहेत. एकदा का राष्ट्रवादाचा जिन बाटलीतून बाहेर पडला की, त्याला परत ठेवणे फार कठीण होऊन बसते, असे त्यांनी म्हटले आहे.
लष्कराचा नवा बॉस या आठवड्यात ठरणार -
पाकिस्तानमध्ये नवीन लष्करप्रमुख नियुक्तीची प्रक्रिया सुरू झाली आहे. शेहबाज सरकारला आशा आहे की, पाकिस्तानचे राष्ट्रपती डॉ.आरिफ अल्वी या प्रक्रियेत कोणताही ‘अडथळा’ निर्माण करणार नाहीत. लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांचा कार्यकाळ २९ नोव्हेंबरपर्यंत आहे. सध्या पाच चण लष्कर प्रमुख पदासाठी शर्यतीत आहेत.