सुटकेआधी लख्वी पुन्हा स्थानबद्ध

By admin | Published: March 15, 2015 01:48 AM2015-03-15T01:48:13+5:302015-03-15T01:48:13+5:30

मुंबई हल्ल्यामागचा सूत्रधार झकी-उर-रेहमान लख्वीची सुटका करण्याआधीच त्याला सार्वजनिक सुरक्षा आदेशातहत आणखी ३० दिवसांसाठी स्थानबद्ध करण्यात आले आहे.

Before the release of the Lakhvi again | सुटकेआधी लख्वी पुन्हा स्थानबद्ध

सुटकेआधी लख्वी पुन्हा स्थानबद्ध

Next

इस्लामाबाद : मुंबई हल्ल्यामागचा सूत्रधार झकी-उर-रेहमान लख्वीची सुटका करण्याआधीच त्याला सार्वजनिक सुरक्षा आदेशातहत आणखी ३० दिवसांसाठी स्थानबद्ध करण्यात आले आहे.
शुक्रवारी पाकिस्तानच्या एका हायकोर्टाने त्याच्या सुटकेचे आदेश दिले होते. यावर भारताने तीव्र आक्षेप घेतला होता. पाकिस्तानमधील पंजाब प्रांताच्या गृह विभागाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, पंजाब सरकारने सार्वजनिक सुरक्षा आदेशातहत (एमपीओ) ३० दिवसांसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. त्याला अदियाला तुरुंगातच ठेवण्यात येणार आहे. गृहमंत्रालयाच्या विनंतीनुसार लख्वीला पुन्हा स्थानबद्ध करण्याचे आदेश देण्यात आले. लख्वी याच्या सुटकेचे आदेश इस्लामाबाद हायकोर्टाने दिल्यानंतर भारताने तीव्र नाराजी व्यक्त करीत पाकिस्तानचे उच्चायुक्त अब्दुल बासित यांना नवी दिल्लीत पाचारण केले होते.

लख्वीला पुन्हा ताब्यात घेऊन पंजाब सरकारने पाकिस्तानच्या संविधानाचे उल्लंघन केले आहे. एवढेच नाहीतर न्यायालयाचा अवमानही केला आहे. याविरुद्ध सोमवारी हायकोर्टात आव्हान देणार असल्याचे लख्वीचे वकील राजा रिझवान अब्बासी यांनी सांगितले.

Web Title: Before the release of the Lakhvi again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.