रिलायन्स जिओची सॅमसंगसोबत भागीदारी
By admin | Published: March 2, 2017 03:57 AM2017-03-02T03:57:05+5:302017-03-02T03:57:05+5:30
रिलायन्स जिओने आपल्या ४जी सेवेत सुधारणा करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील बडी कंपनी सॅमसंगसोबत भागीदारी करार केला
बार्सिलोना : मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स जिओने आपल्या ४जी सेवेत सुधारणा करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील बडी कंपनी सॅमसंगसोबत भागीदारी करार केला आहे. दोन्ही कंपन्यांच्या भागीदारीत आय अँड जी (इनफील अँड ग्रोथ) प्रकल्प सुरू केला आहे.
याद्वारे सध्याच्या नेटवर्कची क्षमता विस्तारित करणे आणि नेटवर्कचे कव्हरेज वाढविणे याकडे लक्ष देण्यात येणार आहे. ८५0, १,८00 आणि २,३00 एमएचझेड बँडचा वापर करून दाटीवाटीच्या शहरी भागांत इनडोअर आणि आउटडोअर कव्हरेज वाढविण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील कव्हरेज वाढवून देशाच्या ९0 टक्के लोकसंख्येपर्यंत पोहोचण्याचा
प्रयत्न कंपनी करीत आहे. रिलायन्स जिओचे अध्यक्ष ज्योतिंद्र ठक्कर यांनी ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, ‘आम्ही भारतात डिजिटल क्षेत्राचा पूर्ण कायापालट करण्याचा संकल्प केला आहे.’ (वृत्तसंस्था)
>८५0, १,८00 आणि २,३00 एमएचझेड बँडचा वापर करून दाटीवाटीच्या शहरी भागांत इनडोअर आणि आउटडोअर कव्हरेज वाढविण्यात येईल.