भीषण! पाकिस्तानमध्ये मोठा बॉम्बस्फोट; ५ शाळकरी मुलं आणि एका पोलिसासह ७ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2024 05:44 PM2024-11-01T17:44:33+5:302024-11-01T17:53:13+5:30

पाकिस्तानमध्ये शुक्रवारी मोठा बॉम्बस्फोट झाला आहे, ज्यामध्ये ५ शाळकरी मुलं आणि एका पोलिसासह ७ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच २२ जण जखमी झाले आहेत.

remote blast in south west pakistan 7 people killed including 5 school children | भीषण! पाकिस्तानमध्ये मोठा बॉम्बस्फोट; ५ शाळकरी मुलं आणि एका पोलिसासह ७ जणांचा मृत्यू

फोटो - रॉयटर्स

पाकिस्तानमध्ये शुक्रवारी मोठा बॉम्बस्फोट झाला आहे, ज्यामध्ये ५ शाळकरी मुलं आणि एका पोलिसासह ७ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच २२ जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये बहुतांश शाळकरी मुलांचा समावेश आहे. हा हल्ला रिमोट कंट्रोल बॉम्बच्या साह्याने करण्यात आला. दक्षिण पाकिस्तानातील बलुचिस्तान प्रांतातील सिव्हिल हॉस्पिटल चौकात हा स्फोट झाला. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मस्तुंग जिल्ह्यातील सिव्हिल हॉस्पिटल चौकातील हायस्कूलजवळ सकाळी ८.३५ वाजता झालेल्या बॉम्बस्फोटात पोलीस व्हॅनला टार्गेट करण्यात आलं. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे. कलात विभागाचे आयुक्त नईम बाजई म्हणाले, स्फोटात आयईडी (इम्प्रोव्हायझ्ड एक्सप्लोसिव्ह डिव्हाईस) वापरण्यात आलं होतं. 

शाळेजवळ उभ्या असलेल्या पोलिसांचं वाहन त्यांचं टार्गेट होतं. आतापर्यंत सात जणांचा मृत्यू झाला असून त्यात पाच शालेय विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. या हल्ल्यात २२ जण जखमी झाले आहेत. अशा परिस्थितीत मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. सध्या जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

जिओ न्यूजच्या रिपोर्टनुसार, जखमींमध्ये बहुतांश शाळकरी मुलं आहेत, त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या स्फोटात एक पोलीस व्हॅन आणि अनेक ऑटोचं नुकसान झालं. आरोग्य विभागाच्या प्रवक्त्याचा हवाला देत रिपोर्टमध्ये म्हटलं आहे की, स्फोटानंतर क्वेटाच्या सर्व रुग्णालयांमध्ये आणीबाणी घोषित करण्यात आली आहे आणि सर्व डॉक्टर, फार्मासिस्ट, स्टाफ नर्स आणि इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांना पाचारण करण्यात आलं आहे.

Web Title: remote blast in south west pakistan 7 people killed including 5 school children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.