फ्लॉईड घटनेची लंडनमध्ये पुनरावृत्ती?; पोलिसाने आरोपीचा गळा गुडघ्याने दाबला 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2020 10:44 PM2020-07-18T22:44:15+5:302020-07-19T06:16:21+5:30

संबंधित पोलिसांनी आरोपीला हाताळताना केलेले वर्तन नक्कीच चिंता उत्पन्न करणारे आहे.

Repeat of the Floyd incident in London ?; Police strangled the accused | फ्लॉईड घटनेची लंडनमध्ये पुनरावृत्ती?; पोलिसाने आरोपीचा गळा गुडघ्याने दाबला 

फ्लॉईड घटनेची लंडनमध्ये पुनरावृत्ती?; पोलिसाने आरोपीचा गळा गुडघ्याने दाबला 

Next

लंडन : सार्वजनिक ठिकाणी चाकू घेऊन वावरण्याच्या आरोपावरून लंडनमध्ये अटक केलेल्या एका कृष्णवर्णी व्यक्तीस फूटपाथवर आडवे पाडून एक गौरवर्णी पोलीस गुडघ्याने त्याचा गळा दाबत असल्याचा ‘अस्वस्थ करणारा’ व्हिडिओ समाजमाध्यमांत व्हायरल झाल्यानंतर त्या पोलिसास तात्काळ निलंबित करण्यात आले व त्याच्या सहकाऱ्याला बंदोबस्ताच्या कामापासून दूर ठेवण्यात आले आहे.

अमेरिकेच्या मिनिआपोलिस शहरातही अशाच प्रकारच्या घटनेत २५ मे रोजी जॉर्ज फ्लॉईड या कृष्णवर्णी संशयिताचा मृत्यू झाल्यानंतर संपूर्ण अमेरिकेत संतप्त प्रतिक्रिया उमटून ‘ब्लॅक लाईव्ज मॅटर’ हे उत्स्फू र्त आंदोलन उभे राहिले होते. त्या आंदोलनाचे पडसाद उमटून ब्रिटनमध्येही त्यावेळी निदर्शने झाली होती. लंडन महानगराचे पोलीस उपायुक्त सर स्टीव हाऊस म्हणाले, ‘समाजमाध्यमांत व्हायरल झालेला जो व्हिडिओ आज मी पाहिला तो खूपच अस्वस्थ करणारा आहे.

संबंधित पोलिसांनी आरोपीला हाताळताना केलेले वर्तन नक्कीच चिंता उत्पन्न करणारे आहे. ही घटना उद्विग्न करणारी आहे. आम्ही हा विषय वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे नेला आहे. त्यांनी या गैरवर्तनाची चौकशी करण्याचे जाहीर केले, याचे मी स्वागत करतो, असे लंडन महानगरचे मेयर सादिक खान म्हणाले.

नेमके काय झाले?

व्हिडिओमध्ये दिसणाºया ४५ वर्षीय कृष्णवर्णी आरोपीचे नाव माईक कौतेन, असे आहे. पोलिसांनी त्याला पकडून हातकड्या घातल्यानंतरही फूटपाथवर आडवा पाडले. एका पोलीस अधिकाºयाने त्याच्या अंगावर बसून गुडघ्याने त्याचा गळा व हाताने डोके दाबून धरल्याचे व्हिडिओत दिसते.

च्दुसºया पोलीस अधिकाºयाने आरोपीच्या मांड्या दाबून धरल्याचे दिसते. रस्त्यावरून येणाºया-जाणाºयांनी पोलिसांच्या या वर्तनास आक्षेप घेतला. नंतर पोलिसांच्या गाड्या आल्या व माईक कौतेनला घेऊन गेल्या. च्प्रत्यक्षदर्शींपैकी कोणीतरी हा संपूर्ण घटनाक्रम कॅमेºयात नोंदविला व तो व्हिडिओ नंतर ‘बीबीसी टीव्ही’वरही दाखविण्यात आला. मुळात आरोपीच्या हातात बेड्या घातलेल्या असूनही पोलिसांनी त्याच्याशी एवढे निर्दयीपणाचे वर्तन करावे, यावरून सर्वदूर संताप व्यक्त केला जात आहे.

Web Title: Repeat of the Floyd incident in London ?; Police strangled the accused

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.