पुन्हा पुन्हा वापरता येणारा अग्निबाण विकसित; चाचणी यशस्वी

By admin | Published: December 23, 2015 02:34 AM2015-12-23T02:34:53+5:302015-12-23T02:34:53+5:30

अमेरिकेच्या स्पेस एक्स कंपनीने फाल्कन -९ अग्निबाण अवकाशात सोडून तो परत जमिनीवर पूर्ववत उतरविण्यात मंगळवारी यश प्राप्त केले आहे.

Repeat Rocket develops; Test successful | पुन्हा पुन्हा वापरता येणारा अग्निबाण विकसित; चाचणी यशस्वी

पुन्हा पुन्हा वापरता येणारा अग्निबाण विकसित; चाचणी यशस्वी

Next

मियामी : अमेरिकेच्या स्पेस एक्स कंपनीने फाल्कन -९ अग्निबाण अवकाशात सोडून तो परत जमिनीवर पूर्ववत उतरविण्यात मंगळवारी यश प्राप्त केले आहे. विमानांसारखा पुन्हा वापरता येण्याजोगा अग्निबाण बनविण्याचा हा पहिलाच प्रयोग असल्यामुळे ऐतिहासिक मानला जात आहे. पृथ्वीवर परतण्यापूर्वी ११ संदेश दळणवळण उपग्रह या अग्निबाणाने सुरक्षित अवकाश प्रक्षेपित केले.
कॅलिफोर्नियाच्या हॉथ्रोन येथील कंपनीच्या मुख्यालयात उत्साहित व आनंदी वातावरणात एकत्र जमलेल्या सहकाऱ्यांसमोर प्रवक्त्याने ‘फाल्कन जमिनीवर सुखरूप परतले’ असे जाहीर करताच एकच जल्लोष झाला.
स्पेस एक्सच्या बेव प्रसारणात अग्निबाण केप कनेवेराल तळावर यशस्वीरीत्या उतरत असल्याचे दाखविण्यात आले. कंपनीने टष्ट्वीट करूनही ही बातमी दिली. त्यात म्हटले आहे की, फाल्कनने पहिला टप्पा पार पाडला आहे. अमेरिकन अवकाश संशोधन संस्था नासाने कंपनीला अभिनंदनाचा संदेश धाडला आहे.
हा प्रयोग यशस्वी झाल्यामुळे अवकाश संशोधनात एक महत्त्वाचा टप्पा पार पडला आहे. अग्निबाण पुन्हा पुन्हा वापरात आल्याने खर्चात कपात होईल. यापूर्वी जूनमध्ये झालेला प्रयोग फसला होता.
फाल्कनचे तुकडे तुकडे होऊन तो पेटला होता. यावेळी सुधारित असा २३ मजली उंच अग्निबाण केप कनेवेराल हवाई तळावरून अवकाशात झेपावला व अवघ्या १० मिनिटात आपली कामगिरी पार पाडून तळाच्या दक्षिणेकडील ९ कि.मी. अंतरावरील तळावर परतला. (वृत्तसंस्था)
> नवा शोध... ‘स्पेस एक्स’ कंपनीचा ‘फाल्कन ९’ अग्निबान मंगळवारी अकरा उपग्रहांसह अंतराळात झेपावला व अवघ्या दहा मिनिटात कामगिरी पार पाडून परत तळावर आला. कंपनीच्या वेबसाईटवर ही घटना दाखविण्यात आली. अनेक प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर आज ही कामगिरी यशस्वी पार पडली.

Web Title: Repeat Rocket develops; Test successful

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.