विश्वाच्या प्राथमिक स्थितीची प्रतिकृती
By admin | Published: February 16, 2016 03:16 AM2016-02-16T03:16:38+5:302016-02-16T03:16:38+5:30
विश्वाच्या प्राथमिक स्थितीची छोटी प्रतिकृती तयार करण्यात आली असून, यासाठी शास्त्रज्ञांनी जगातील सर्वाधिक शक्तिशाली कण वेगवर्धकात प्रमुख अणूंची अत्याधिक ऊर्जेतून टक्कर घडविली
Next
जिनेव्हा : विश्वाच्या प्राथमिक स्थितीची छोटी प्रतिकृती तयार करण्यात आली असून, यासाठी शास्त्रज्ञांनी जगातील सर्वाधिक शक्तिशाली कण वेगवर्धकात प्रमुख अणूंची अत्याधिक ऊर्जेतून टक्कर घडविली. सर्न या जगातील सर्वाधिक मोठ्या प्रयोगशाळेतील लार्ज हैड्रन कोलायडरमध्ये ही प्रतिकृती तयार करण्यात आली आहे.
महाविस्फोटानंतर अत्यंत उष्ण आणि घन अवस्थेत विश्व अस्तित्वात आले. यात प्रामुख्याने क्वार्क आणि ग्लुओनसह मूलभूत द्रव्यकण होते. या स्थितीला क्वार्क ग्लुओन प्लाझ्मा संबोधण्यात आले. (वृत्तसंस्था)