भारतावरील ‘तो’ अहवाल फेटाळला
By admin | Published: June 22, 2014 01:38 AM2014-06-22T01:38:49+5:302014-06-22T01:38:49+5:30
भारत गोपनीयरीत्या अण्वस्त्रक्षमता वाढवत असल्याचा अहवाल अमेरिकेने फेटाळून लावताना ते नुसते तर्कवितर्क असल्याचे म्हटले आहे.
Next
>वॉशिंग्टन : भारत गोपनीयरीत्या अण्वस्त्रक्षमता वाढवत असल्याचा अहवाल अमेरिकेने फेटाळून लावताना ते नुसते तर्कवितर्क असल्याचे म्हटले आहे.
म्हैसूरनजीक भारताचा दुर्मिळ धातू प्रकल्प असून तेथे एका संभाव्य नव्या युरेनियम हेक्साफ्लोराईड प्रकल्पाचा शोध लावण्यात आला आहे, असा दावा संरक्षण व सुरक्षा गुप्तचर तज्ज्ञांनी आयएचएस जेन यांच्या अहवालात केला आहे.
अमेरिकी परराष्ट्र खात्याच्या प्रवक्त्या जेन साकी यांना या अहवालाविषयी पत्रकार परिषदेत विचारणा करण्यात आली होती. यावर त्या म्हणाल्या, आम्ही त्याच्या निष्कर्षावर अंदाज लावण्याच्या स्थितीत नाही. बिगरलष्करी अणुकरारांतर्गत आम्ही भारताची लष्करक्षमता किंवा त्याचा शस्त्रसाठा वाढेल, असे काहीही त्याला पुरवत नसल्याचे त्यांनी सांगितले. आमच्याकडे या अहवालाबाबत एवढी माहिती नाही की, आम्ही त्यावर काही बोलू शकू. (वृत्तसंस्था)
मी अहवालाविषयी ठामपणो सांगू शकत नाही आणि तसे करणो केवळ अटकळबाजी ठरेल. (वृत्तसंस्था)