खायला अन्न नाही, पोटं खपाटीला अन् हाडाची झाली काडं... संयुक्त राष्ट्राच्या अन्न आणि कृषी संघटनेचा अहवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2023 10:29 AM2023-12-12T10:29:33+5:302023-12-12T10:29:47+5:30

हवामान बदल यामुळे लाखो नागरिकांची रोजीरोटी गेल्याने कुपोषित राहणाऱ्या नागरिकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे अहवालात म्हटले आहे.

report said that the number of malnourished citizens is increasing day by day as millions of citizens lose their livelihoods due to climate change | खायला अन्न नाही, पोटं खपाटीला अन् हाडाची झाली काडं... संयुक्त राष्ट्राच्या अन्न आणि कृषी संघटनेचा अहवाल

खायला अन्न नाही, पोटं खपाटीला अन् हाडाची झाली काडं... संयुक्त राष्ट्राच्या अन्न आणि कृषी संघटनेचा अहवाल

बँकॉक : अन्न असुरक्षितता ही आशियातील जुनी समस्या असून, कोरोना महामारीच्या तुलनेत २०२२ मध्ये ५.५ कोटींपेक्षा अधिक लोकांना दोन वेळचे अन्न न मिळाल्याने ते कुपोषित राहिले, असे संयुक्त राष्ट्राच्या अहवालात म्हटले आहे. कोरोनानंतर अनेक देशांच्या अर्थव्यवस्थांमध्ये आलेली मंदी, नैसर्गिक आपत्ती, युद्धामुळे अन्नपुरवठ्यात आलेली बाधा, हवामान बदल यामुळे लाखो नागरिकांची रोजीरोटी गेल्याने कुपोषित राहणाऱ्या नागरिकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे अहवालात म्हटले आहे.

जगासाठी ३० टक्के धोका

येथील लोकांना अन्न असुरक्षिततेचा सामना करावा लागत असून, अन्न मिळविण्याच्या त्यांच्या क्षमतेबद्दल अनिश्चितता असते आणि पैशाच्या कमतरतेमुळे सतत रिकामे पोट ठेवावे लागले. सतत उपाशी राहिल्यामुळे त्यांचे आरोग्य धोक्यात येण्याचा गंभीर धोका निर्माण होतो. जगासाठी हा धोका ३० टक्के तर आशिया आणि पॅसिफिकसाठी २५ टक्क्यांपेक्षा जास्त आहे.

महिलांवर मोठे संकट

कुपोषण महिलांसाठी सर्वांत वाईट समस्या आहे. आशियातील पाचपैकी एका महिलेला तीव्र अन्न असुरक्षिततेचा सामना करावा लागतो. द. आशियामध्ये ४२%महिलांना, तर ३७% पुरुषांना कुपोषणाचा सामना करावा लागत आहे.

युद्धाने घास हिरावला

कोरोनानंतर अन्न, इंधन, खते आणि पशुधनाच्या खाद्याच्या किमती वाढल्याने अन्न सुरक्षा मोहिमेवर परिणाम झाला. युद्धामुळे धान्य, खाद्यतेल पुरवठ्यात व्यत्यय आल्याने  समस्या निर्माण झाल्या आहेत. 

Web Title: report said that the number of malnourished citizens is increasing day by day as millions of citizens lose their livelihoods due to climate change

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.