ट्रम्प यांच्या विरोधात रिपब्लिकनचे नेते एकत्र

By admin | Published: March 4, 2016 02:36 AM2016-03-04T02:36:47+5:302016-03-04T02:36:47+5:30

मंगलच्या महादंगलला एक दिवस उलटत नाही तोच अमेरिकेत आता रिपब्लिकन पक्षात नवे राजकारण शिजत आहे. पक्षाकडून उमेदवारीसाठी इच्छुक सर्वात प्रबळ दावेदार डोनाल्ड ट्रम्प यांना

The Republican leaders gathered against Trump | ट्रम्प यांच्या विरोधात रिपब्लिकनचे नेते एकत्र

ट्रम्प यांच्या विरोधात रिपब्लिकनचे नेते एकत्र

Next

वॉशिंग्टन : मंगलच्या महादंगलला एक दिवस उलटत नाही तोच अमेरिकेत आता रिपब्लिकन पक्षात नवे राजकारण शिजत आहे. पक्षाकडून उमेदवारीसाठी इच्छुक सर्वात प्रबळ दावेदार डोनाल्ड ट्रम्प यांना उमेदवारीपासून रोखण्यासाठी रिपब्लिकनचे नेते एकत्र होताना दिसत आहेत. १५ राज्यांतील प्रायमरीत ट्रम्प हे १० राज्यांत जिंकले आहेत.
एक फेब्रुवारीपासून आयोवा कॉकसपासून सुरू झालेल्या निवडणुकीच्या झंझावातात ट्रम्प यांनी एका महिन्यात मोठे विजय संपादन करीत राजकीय निरीक्षकांनाही चकित केले आहे. मंगळवारच्या मतदानानंतर ट्रम्प यांच्याकडे ३१९ प्रतिनिधींचे समर्थन आहे, तर त्यांचे प्रतिस्पर्धी टेड क्रूज यांच्याकडे २२६ आणि मार्को रुबियो यांच्याकडे ११० प्रतिनिधींचे समर्थन आहे. मीडियातील वृत्तानुसार रिपब्लिकन नेतृत्वाला अब्जाधीश ट्रम्प हे पक्षाचे उमेदवार म्हणून नको आहेत. (वृत्तसंस्था)

Web Title: The Republican leaders gathered against Trump

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.