रिपब्लिकन इच्छुकांचा इराण मुद्यावरून ओबामांवर हल्ला
By admin | Published: August 7, 2015 10:06 PM2015-08-07T22:06:44+5:302015-08-07T22:06:44+5:30
अध्यक्षीय उमेदवारीच्या रिपब्लिकन इच्छुकांनी पहिल्या वादविवादात भाग घेताना एकमेकांवर जोरदार हल्ले चढविले; मात्र इस्लामिक स्टेट व इराणचा
वॉशिंग्टन : अध्यक्षीय उमेदवारीच्या रिपब्लिकन इच्छुकांनी पहिल्या वादविवादात भाग घेताना एकमेकांवर जोरदार हल्ले चढविले; मात्र इस्लामिक स्टेट व इराणचा अणुकार्यक्रम या मुद्यावरील राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या धोरणावर टीका करताना ते एकजूट होते.
फॉक्स न्यूजतर्फे क्लेवलँड, ओहियो येथे आयोजित पहिल्या प्राथमिक वादविवादात १७ रिपब्लिकन इच्छुकांपैकी १० इच्छुक सहभागी झाले. त्यांनी इराण, इस्लामिक स्टेट यावर मते मांडली.
रिअल इस्टेट सम्राट डोनाल्ड ट्रम्प यांनी वादविवादादरम्यान अमेरिकी नेत्यांना मूर्ख म्हटले. सिनेटर रॅण्ड पॉल यांच्याशी वाद घातला. फ्लोरिडाचे माजी गव्हर्नर जेब बुश यांनी ट्रम्प यांच्यावर फुटीरतावादी भाषा वापरल्याचा आरोप करून अशा प्र्रकारची शिवराळ भाषा रिपब्लिकनला व्हाईट हाऊस जिंकण्यास मदत करणार नाही, असा इशाराही दिला. (वृत्तसंस्था)