जगाचा भूगोल बदलणारे संशोधन! ७ नाही सहा खंड; प्रचलित मान्यता बदलणार की तशीच ठेवणार?  

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2025 13:40 IST2025-01-28T13:40:13+5:302025-01-28T13:40:58+5:30

आशिया, युरोप, आफ्रिका, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, अंटार्टिका आणि ऑस्ट्रेलिया असे सात खंड आहेत. भूवैज्ञानिकांनी युरोप आणि उत्तर अमेरिका हे वेगवेगळे खंड असल्याचे आधीच मानले आहे.

Research that will change the geography of the world! Not 7, but 6 continents; Will the prevailing belief change or remain the same? | जगाचा भूगोल बदलणारे संशोधन! ७ नाही सहा खंड; प्रचलित मान्यता बदलणार की तशीच ठेवणार?  

जगाचा भूगोल बदलणारे संशोधन! ७ नाही सहा खंड; प्रचलित मान्यता बदलणार की तशीच ठेवणार?  

जगाच्या नकाशावर किती खंड आहेत असे विचारले असता तुम्ही सात असे उत्तर द्याल, बरोबर. आपल्या भुगोलाच्या पुस्तकात हेच शिकविले आहे. परंतू, आता सर्व संशोधकांचे मतैक्य झाले तर हे पुस्तकच नव्याने लिहावे लागणार आहे. पृथ्वीवर सात नाही तर सहा खंड असल्याचा दावा करण्यात आला आहे. 

आशिया, युरोप, आफ्रिका, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, अंटार्टिका आणि ऑस्ट्रेलिया असे सात खंड आहेत. भूवैज्ञानिकांनी युरोप आणि उत्तर अमेरिका हे वेगवेगळे खंड असल्याचे आधीच मानले आहे. नवीन अभ्यासात महासागरांच्या खाली जटील परिस्थिती असू शकते, असे समोर आले आहे. 

महासागराखाली गेलेली जमीन ग्रीनलँडपासून फॅरो बेटांपर्यंत पसरलेली आहे. पृथ्वीखालील टेक्टोनिक प्लेट्स अजूनही आश्चर्यकारक मार्गांनी वेगळ्या होऊ शकतात, असे या संशोधनात गृहीत धरण्यात आले आहे. या अभ्यासातून मिळालेली नवीन माहिती भविष्यात आपण पृथ्वीला खंडांमध्ये कसे विभाजित करतो यावर परिणाम करू शकते, असे अनेक शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. 

आइसलँडच्या ज्वालामुखीच्या थराखाली काय आहे या विषयावर डर्बी विद्यापीठात पृथ्वी विज्ञानाचे व्याख्याते असलेले डॉ. डार्डेन फेथेन यांनी संशोधन केले आहे. ते या संशोधकांच्या टीमचा भाग आहेत. त्यांना स्वित्झर्लंड, इटली व अमेरिकेच्या संशोधकांनी मदत केली आहे. या संशोधकांना आफ्रिकेतील आफ्रा प्रदेश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रदेशाच्या निर्मितीमागे आणि आइसलँडमध्ये अनेक समानता आढळल्या आहेत. दोन्ही ठिकाणी भेगा कशा निर्माण होतात यावर अभ्यास करण्यात आला. यात त्यांना रिफ्टेड ओशियनिक मॅग्मॅटिक पठार हा नवीन गुणधर्म आढळला. उत्तर अमेरिकन आणि युरेशियन प्लेट्स अजूनही पूर्णपणे वेगळे झालेले नाहीत, असे आढळून आले आहे. 

पूर्वीच्या संशोधकांनी हे दोन्ही जमिनीचे तुकडे लाखो वर्षांपूर्वीच वेगळे झाले असल्याचे गृहीत धरले होते. यामुळे ते वेगळे खंड आहेत, असेही मानले होते. परंतू, आताच्या या संशोधनाने खंडाच्या व्याख्येनुसार जर दोन्ही खंडाच्या टेक्टोनिक प्लेट्स वेगळ्या नसतील तर ते एकच खंड आहेत, असे सिद्ध केले आहे. ही विभाजनाची प्रक्रिया अद्यापही सुरुच आहे. 

आता यावरून संशोधकांमध्ये वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अनेक शास्त्रज्ञ त्यांना पूर्वीच सांगितल्यानुसार अमेरिका आणि युरोप हे खंड ५२ दशलक्ष वर्षांपूर्वीच वेगळे झाले आहेत, असे मानतात. परंतू, विज्ञानाने आता हे वेगळे झालेले नाहीत हे सिद्ध केल्याने हे संशोधक ते मान्य करतील की नाही, हे येणारा काळच सांगू शकणार आहे.

Web Title: Research that will change the geography of the world! Not 7, but 6 continents; Will the prevailing belief change or remain the same?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.