संशोधकांचा दावा, ‘ते’ दिवस परत येऊ शकतात; अंध उंदरांना मिळली दृष्टी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2023 01:09 PM2023-01-17T13:09:36+5:302023-01-17T13:09:51+5:30

वृद्धत्व ही एक उलट करता येणारी प्रक्रिया म्हणजेच वृद्धत्व पुढे-मागे करता येत असल्याचे मत नोंदवले आहे.

Researchers claim, The bygone days of age may return. | संशोधकांचा दावा, ‘ते’ दिवस परत येऊ शकतात; अंध उंदरांना मिळली दृष्टी

संशोधकांचा दावा, ‘ते’ दिवस परत येऊ शकतात; अंध उंदरांना मिळली दृष्टी

Next

वॉशिंग्टन - अंदलीब शादानी यांचा शेर आहे- ‘झूठ है सब, तारीख हमेशा अपने को दोहराती है/अच्छा, मेरा ख्वाबे-जवानी थोडा-सा दोहराए. जीवनातील हे सत्य ‘कोई लौटा दे मेरे बीते हुए दिन’ या चित्रपटातील गाण्यात व्यक्त झाले आहे. मात्र आता अमेरिकन शास्त्रज्ञांनी असा दावा आहे की, वयाचे गेलेले दिवस परत येऊ शकतात.

बोस्टन लॅबमधील हार्वर्ड मेडिकल स्कूलच्या ब्लावात्निक इन्स्टिट्यूटच्या शास्त्रज्ञांनी उंदरांवर संशोधन केल्यानंतर, वृद्धत्व ही एक उलट करता येणारी प्रक्रिया म्हणजेच वृद्धत्व पुढे-मागे करता येत असल्याचे मत नोंदवले आहे.

शरीरात यौवनाचा बॅकअप
शरीरात यौवनाची बॅकअप कॉपी असते, ज्यामुळे वय कमी करण्यासाठी उपयोगी आणले जाऊ शकते. वय वाढणे हे आनुवांशिक उत्परिवर्तनांचे परिणाम असतात, त्यामुळे डीएनए कमकुवत केला जातो, या या दीर्घकाळापासून चालत आलेल्या विश्वासाला नवीन संशोधनाने आव्हान दिले आहे. यात शरीरातील खराब झालेल्या सेल्युलर पेशींची संख्या वाढते, ज्यामुळे आजार किंवा मृत्यू होतो.     - डेव्हिड सिंक्लेअर, संशोधनाचे लेखक 

जुन्या संगणकातील करप्ट सॉफ्टवेअर
सिंक्लेअर म्हणाले की, खराब झालेल्या पेशी वृद्धत्वाचे कारण नाहीत. मूळ डीएनए वाचण्याची पेशींची क्षमता कमी होते. 
तिला काम कसे करायचे आहे हे ती विसरते. जुन्या संगणकांमध्ये ज्याप्रमाणे करप्ट सॉफ्टवेअर असते, त्याप्रमाणे ही स्थिती होती. 
सहलेखक जे-ह्यून यांग यांच्या मते, हे संशोधन वृद्धत्वाच्या प्रक्रियेकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल.

काही वृद्ध अंध उंदरांना त्यांची दृष्टी परत मिळाली. त्यांच्यामध्ये पूर्वीपेक्षा अधिक हुशार आणि तरुण मेंदू विकसित झाला. स्नायू आणि किडनीही उत्तम झाली, तर दुसऱ्या बाजूला काही तरुण उंदीर अकाली वृद्ध झाले.शरीराच्या प्रत्येक पेशीवर घातक परिणाम दिसून आले. हे संशोधन ‘सेल’ जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.

Web Title: Researchers claim, The bygone days of age may return.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.