संशोधकांनी टिपले कोरोना विषाणूबाधित पेशींचे छायाचित्र
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2020 01:21 AM2020-09-14T01:21:47+5:302020-09-14T01:22:10+5:30
फुफ्फुसातील पेशींवरही कोरोना विषाणूच्या संसर्गाचा परिणाम होतो. त्या पेशींचे छायाचित्र संशोधकांनी काढले व अभ्यासकांसाठी उपलब्ध करून दिले आहे.
वॉशिंग्टन : कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याने माणसाच्या श्वसनमार्गातील पेशींवरही त्याचा विपरीत परिणाम होतो. त्या पेशींचे छायाचित्र नॉर्थ कॅरोलिना विद्यापीठातील चिल्ड्रन्स रिसर्च इन्स्टिट्यूटमधील शास्त्रज्ञांनी प्रसिद्ध केले आहे.
फुफ्फुसातील पेशींवरही कोरोना विषाणूच्या संसर्गाचा परिणाम होतो. त्या पेशींचे छायाचित्र संशोधकांनी काढले व अभ्यासकांसाठी उपलब्ध करून दिले आहे. माणसाच्या श्वसनमार्गात कोरोना विषाणूचे अस्तित्व ठळकपणे दर्शविणारे हे छायाचित्र वैद्यकीय तज्ज्ञांसाठी महत्त्वाचा दुवा आहे.
या संशोधकांनी प्रयोगशाळेमध्ये माणसांच्या फुफ्फुसाच्या पेशींमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग घडवून आणला व त्यानंतर ९६ तासांनी या पेशींचे निरीक्षण करून हे छायाचित्र काढण्यात आले आहे. त्यात कोरोना विषाणूचे केसाएवढे सूक्ष्म भाग श्वसनमार्गात आढळून आले आहेत.