पाकला लढाऊ विमाने विकण्याविरुद्ध ठराव
By admin | Published: February 27, 2016 01:45 AM2016-02-27T01:45:18+5:302016-02-27T01:45:18+5:30
पाकिस्तानला आठ एफ-१६ लढाऊ विमानांसह शस्त्रास्त्रे विकण्याच्या कराराला काँग्रेसची नापसंती असल्याचे दाखविण्यासाठी वरिष्ठ अमेरिकन सिनेटरने हाऊस आॅफ
वॉशिंग्टन : पाकिस्तानला आठ एफ-१६ लढाऊ विमानांसह शस्त्रास्त्रे विकण्याच्या कराराला काँग्रेसची नापसंती असल्याचे दाखविण्यासाठी वरिष्ठ अमेरिकन सिनेटरने हाऊस आॅफ रिप्रेझेंटेटिव्हज्मध्ये ‘संयुक्त ठराव’ मांडला आहे.
अमेरिकेकडून मिळणाऱ्या शस्त्रांचा वापर पाकिस्तान आपल्याच नागरिकांना (विशेषत: बलुचिस्तानमधील) दडपण्यासाठी वापरत आहे, असे डॅना रोहराबाचेर यांनी गुरुवारी वरील ठराव मांडताना म्हटले. भारतात लोकसभा हे जसे कनिष्ठ लोकप्रतिनिधीगृह आहे तसेच हाऊस आॅफ रिप्रेझेंटेटिव्ह आहे.
या महिन्यात बराक ओबामा प्रशासनाने पाकिस्तानला ७०० दशलक्ष अमेरिकन डॉलरची शस्त्रास्त्रे विकण्याचा करार अधिकृतपणे जाहीर केला होता. या कराराला भारताने तीव्र विरोध दर्शविला आहे. (वृत्तसंस्था)
पाकला गरज आहेच
भारत आणि रोहराबाचेर यांनी या शस्त्रास्त्रे कराराला कठोर विरोध केल्यानंतरही पाकिस्तानला दहशतवादाविरोधात लढ्यासाठी एफ-१६ विमाने अतिशय महत्त्वाचा भाग आहे, अशा शब्दांत अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री जॉन केरी यांनी हाऊस आॅफ रिप्रेझेंटेटिव्हज्मध्ये म्हटले.