कंपनीने 210 कोटींचा बोनस केला जाहीर, कर्मचारी आनंदाने गेले भारावून
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2022 01:23 PM2022-05-14T13:23:11+5:302022-05-14T13:24:46+5:30
ही घोषणा Employee Appreciation पार्टीवेळी करण्यात आली. त्यानंतर उपस्थित सर्व कर्मचारी आनंदाने नाचू लागले.
एका कंपनीने आपल्या सर्व 5400 कर्मचाऱ्यांना जवळपास 4-4 लाख रुपयांचा बोनस जाहीर केला आहे. ही घोषणा Employee Appreciation पार्टीवेळी करण्यात आली. त्यानंतर उपस्थित सर्व कर्मचारी आनंदाने नाचू लागले. ही बातमी अमेरिकेतील लास वेगासमधील आहे.
कॉस्मोपॉलिटन कंपनीचे सीईओ बिल मॅकबेथ या पार्टीदरम्यान स्टेजवर आले आणि त्यांनी कर्मचाऱ्यांना बोनस देण्याची घोषणा केली. बोनस देण्याच्या निर्णयामुळे त्यांच्या कंपनीला जवळपास 210 कोटींचा खर्च उचलावा लागणार आहे.
कॉस्मोपॉलिटन हे लास वेगासचे एक अतिशय आकर्षक स्ट्रिप रिसॉर्ट आहे. ते 2010 मध्ये उघडण्यात आले. पण लवकरच तोट्यात गेले. त्यानंतर 2014 मध्ये ब्लॅकस्टोनने ते 131 अब्ज रुपयांना विकत घेतले होते.
रिसॉर्ट कंपनीच्या या घोषणेनंतर पार्टीमध्ये उपस्थित प्रत्येकजण कर्मचारी आनंदाने भरून गेले. हजारो कर्मचारी आनंदाने नाचू लागले. जवळपास चार लाख रुपयांचा बोनस मिळाल्याने कर्मचाऱ्यांनी आनंदोत्सव साजरा करण्यास सुरुवात केली.
कॉस्मोपॉलिटनचे डॅनियल एस्पिनो म्हणाले की, जरी तुम्ही खोली स्वच्छ करत असाल, जेवण तयार करत असाल, कार्ड्स सांभाळत असाल, ड्रिंक्स सर्व्ह करत असाल किंवा फ्रंट डेस्कवर काम करत असाल तरी तुम्हीच प्रत्येक दिवस खास बनवता.
दरम्यान, कोरोना महामारीच्या काळात चांगले वातावरण राखल्याबद्दल कंपनीने कर्मचाऱ्यांना हे बक्षीस दिले आहे. 2014 मध्ये ब्लॅस्टोनने ही कंपनी विकत घेतली होती. गेल्या 7 वर्षात मॅकबेथ यांच्या रिसॉर्टने चॅरिटीसाठी जवळपास 70 कोटी रुपयांची देणगी दिली आहे. आता सर्व कर्मचाऱ्यांना बोनस देण्यासाठी कंपनीला जवळपास 210 कोटी रुपये लागणार असल्याचे कंपनीच्या प्रतिनिधींनी सांगितले आहे.