अफगाणिस्तानात मतदानाला प्रतिसाद
By admin | Published: June 15, 2014 03:03 AM2014-06-15T03:03:19+5:302014-06-15T03:03:19+5:30
अफगाण राष्ट्राध्यक्षपदासाठी शनिवारी दुसऱ्या फेरीतील मतदानास मोठा प्रतिसाद मिळाला. मतदारांनी तालिबानच्या धमक्या धुडकावून लावत आपला कौल मतपेटीत बंद केला
काबूल : अफगाण राष्ट्राध्यक्षपदासाठी शनिवारी दुसऱ्या फेरीतील मतदानास मोठा प्रतिसाद मिळाला. मतदारांनी तालिबानच्या धमक्या धुडकावून लावत आपला कौल मतपेटीत बंद केला. चालू वर्षअखेरीस अमेरिकेच्या नेतृत्वाखाली नाटो सैन्य अफगाणिस्तानातून मायदेशी परतणार आहे.
दरम्यान, सुरुवातीच्या काही तासांत कोणत्याही मोठ्या हल्ल्याचे वृत्त नाही. तथापि, राजधानी काबूल येथील विमानतळाजवळ झालेल्या दोन रॉकेट हल्ल्यांची जबाबदारी तालिबानने घेतली आहे. यात कुणालाही इजा झालेली नाही. दिवसभरात किरकोळ स्वरूपाचे सुमारे १५० हल्ले झाले. यापैकी एका हल्ल्यात एकाच कुटुंबातील पाच जण मारले गेले.
दुसऱ्या टप्प्यातील या मतदानामुळे निवडणूक रिंगणातील माजी परराष्ट्रमंत्री अब्दुल्ला अब्दुल्ला आणि जागतिक बँकेचे माजी अर्थतज्ज्ञ अश्रफ गणी यांचे भवितव्य ठरणार आहे. (वृत्तसंस्था)