24 तासांत घेतला बदला! इराणच्या मिसाइल-ड्रोन हल्ल्याला पाकिस्तानचं थेट एअर स्ट्राइकनं प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2024 10:05 AM2024-01-18T10:05:18+5:302024-01-18T10:11:29+5:30

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इराणने केलेल्या हल्ल्याच्या दुसऱ्याच दिवशी पाकिस्तानने हा बदला घेतला आहे.

Revenge taken in 24 hours Pakistan responds to Iran's missile-drone attack with a direct air strike | 24 तासांत घेतला बदला! इराणच्या मिसाइल-ड्रोन हल्ल्याला पाकिस्तानचं थेट एअर स्ट्राइकनं प्रत्युत्तर

24 तासांत घेतला बदला! इराणच्या मिसाइल-ड्रोन हल्ल्याला पाकिस्तानचं थेट एअर स्ट्राइकनं प्रत्युत्तर

इराणने बलुचिस्तानमध्ये केलेल्या ड्रोन आणि मिसाइल हल्ल्याचा पाकिस्तानने बदला घेतल्याचे वृत्त आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इराणने केलेल्या हल्ल्याच्या दुसऱ्याच दिवशी पाकिस्तानने हा बदला घेतला आहे. पाकिस्तानने इराणमधील दहशथवादी ठिकाणांवर कथित हल्ले केले आहेत. तत्पूर्वी, इराणने मंगळवारी रात्रीच्या सुमारास केलेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तान भडकला होता आणि प्रत्युत्तर देण्यासंदर्भात भाष्य केले होते. यावेळी, इराणच्या हल्ल्यात दोन मुले आणि तीन महिलांचा मृत्यू झाल्याचेही पाकिस्तानने म्हटले होते.

पाकिस्तानच्या हल्ल्यापूर्वी इराणचे परराष्ट्र मंत्री आमिर अब्दुल्लाहियान यांनी म्हणाले होते की, "दोन्ही देशांमध्ये बंधुत्वाचे संबंध आहेत. इराणने पाकिस्तानच्या हद्दीत हल्ला केला असला तरी तो हल्ला पाकिस्तानवर नसून पाकिस्तानात लपलेल्या इराणी दहशतवाद्यांवर होता. जैश उल-अदल ही इराणमधील एक दहशतवादी संघटना आहे. तिने पाकिस्तानातील सिस्तान-बलुचिस्तान प्रांतातील काही भागांत आश्रय घेतला आहे."

पाकिस्तान इराण संबंध बिघडले -
इराणच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानने तेहरानमधील आपल्या राजदूताला परत बोलावले आहे. तसेच, इराणच्या राजदूतालाही पाकिस्तानात परतण्यास बंदी घातली आहे. यासंदर्भा बोलताना पाकिस्तान परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या मुमताज झहरा बलोच म्हणाल्या, "पाकिस्तानने आपल्या राजदूताला परत बोलावण्याचा निर्णय घेतला आहे, तसेच, इराणच्या राजदूताला पाकिस्तानात परत येण्याची परवानगी दिली नाही. ते सध्या इराणमध्येच आहेत. त्यांना काही काळ पाकिस्तानात येता येणार नाही."

Web Title: Revenge taken in 24 hours Pakistan responds to Iran's missile-drone attack with a direct air strike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.