रिचर्ड फ्लॅनागन यांना बुकर पुरस्कार
By admin | Published: October 16, 2014 08:24 AM2014-10-16T08:24:16+5:302014-10-16T08:24:16+5:30
आॅस्ट्रेलियन साहित्यिक रिचर्ड फ्लॅनागन यांच्या द नॅरो रोड टु द डीप नाॅर्थ या पुस्तकास प्रतिष्ठेचा मान बुकर पुरस्कार जाहीर झाला आहे.
लंडन, आॅस्ट्रेलियन साहित्यिक रिचर्ड फ्लॅनागन यांच्या द नॅरो रोड टु द डीप नाॅर्थ या पुस्तकास प्रतिष्ठेचा मान बुकर पुरस्कार जाहीर झाला आहे. दुस-या महायुद्धाच्या काळात थायलंड ते म्यानमार यांच्या दरम्यान रेल्वे बांधण्याचे काम करणा-या युद्धबंद्यांच्या जीवनावर हे पुस्तक आधारित असून, ही कथा मानवी नात्यावरील आहे.
फ्लॅनागन यांची ही कादंबरी एक भावभरी प्रेमकथा तसेच मानवी छळ आणि साहस यांची अदभूत गाथा असल्याचे पुरस्कार समितीचे अध्यक्ष ए सी ग्रेलंग यांनी म्हटले आहे. निवड समितीच्या सदस्यांच्या मते युद्धात अडकलेल्या सर्व लोकांचे चित्रण या कादंबरीत असून, या सर्वांना किती मोठी किंमत चुकवावी लागली त्याचे हे वर्णन आहे.
नायक संकल्पनेचे मानवी जीवनाला कितीही आकर्षण असले तरी वेळ आली तर नायक नृशंसतेची सीमा गाठतात व हिंसाचाराची प्रेरणा देतात असे लेखकाने म्हटले असून नायकवादाच्या प्रेरकतेवर प्रश्न निर्माण केला आहे. रिचर्ड यांनी ५० हजार पौंडाचा बुकर पुरस्कार मिळेल असे वाटले नव्हते असे म्हटले आहे.