अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ रिचर्ड एल. थेलर यांना अर्थशास्त्राचे नोबेल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2017 05:13 PM2017-10-09T17:13:08+5:302017-10-09T17:32:16+5:30

अर्थशास्त्रामधील उल्लेखनीय योगदानासाठी रिचर्ड एच. थेलर यांना 2017 सालचा नोबेल पुरस्कार जाहीर झाले आहे.

Richard L. Thaler misses Nobel, Rajan's chance of economics | अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ रिचर्ड एल. थेलर यांना अर्थशास्त्राचे नोबेल

अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ रिचर्ड एल. थेलर यांना अर्थशास्त्राचे नोबेल

Next

नवी दिल्ली -अर्थशास्त्रामधील उल्लेखनीय योगदानासाठी रिचर्ड एच. थेलर यांना 2017 सालचा नोबेल पुरस्कार जाहीर झाले आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन हे सुद्धा अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कारासाठी शर्यतीत होते. मात्र त्यांची संधी हुकली. अर्थशास्त्रामधील मानसिकतेचा सखोल अभ्यास करून त्यांनी दिलेल्या योगदानासाठी  थेलर यांना नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्याचा निर्णय नोबेल समितीने घेतला. 

नोबेल समितीने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे की, डॉक्टर थेलर हे युनिव्हर्सिटी ऑफ शिकागो येथे प्राध्यापक म्हणून काम पाहत आहेत. अर्थशास्त्राच्या क्षेत्रात मानसशास्त्र आणि अर्थशास्त्र यांच्यातील संबंध यावर त्यांनी  अभ्यास केला आहे."  दरम्यान, अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्काराराठी भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांचेही नाव चर्चेत होते. ‘क्लॅरेवेट अॅनॉलिटिक्स’ने नोबेल पुरस्काराच्या संभाव्य विजेत्यांची यादी तयार केली होती. या यादीत रघुराम राजन यांचा नोबेल पुरस्कार विजेत्यांच्या संभाव्य यादीत समावेश करण्यात आला होता. रघुराम राजन यांना नोबेल पुरस्कार मिळाला असता तर अर्थशास्त्रात नोबेल पुरस्कार मिळवणारे ते अमर्त्य सेन यांच्यानंतरचे दुसरे भारतीय अर्थशास्त्रज्ञ ठरले असते. 

रघुराम राजन हे आंतरराष्ट्रीय अर्थतज्ज्ञ म्हणून प्रसिद्ध आहेत. सर्वात कमी वयाचे (40) आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे (आयएमएफ) प्रमुख झालेले राजन हे 2005 मध्ये शोध निबंध सादरीकरण केल्यानंतर प्रसिद्धीच्या झोतात आले. राजन यांनी अमेरिकेतील अर्थतज्ज्ञ आणि बँकिंग क्षेत्रातील तज्ज्ञांसमोर सादरीकरण केलं होतं. त्याचवेळी राजन यांनी आर्थिक मंदीचा अंदाज व्यक्त केला होता. त्यावेळी त्यांचं म्हणणं हसण्यावारी नेण्यात आलं होतं. तीन वर्षांनतर रघुराम राजन यांची भविष्यवाणी खरी ठरली आणि अमेरिकेसह जागतिक अर्थव्यवस्था मंदीच्या खाईत ओढली गेली.

Web Title: Richard L. Thaler misses Nobel, Rajan's chance of economics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.