टेक्नोलॉजीमध्ये सर्वाधिक श्रीमंत बिल गेट्स
By admin | Published: August 6, 2015 05:17 PM2015-08-06T17:17:23+5:302015-08-06T17:27:30+5:30
माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रणी आणि विश्वविख्यात मायक्रोसॉफ्ट कंपनीचे संस्थापक बिल गेट्स जगातील सर्वाधिक श्रीमंत असलेल्या व्यक्तींच्या यादीत आले आहेत.
Next
>ऑनलाइन लोकमत
वॉशिग्टंन, दि. ६ - माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रणी आणि विश्वविख्यात मायक्रोसॉफ्ट कंपनीचे संस्थापक बिल गेट्स जगातील सर्वाधिक श्रीमंत असलेल्या व्यक्तींच्या यादीत आले आहेत. जगभरातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील श्रीमंत व्यक्तींची यादी फोर्ब्जने जाहीर केली आहे. यामध्ये बिल गेट्स प्रथम क्रमांकावर आहेत.
फोर्ब्जने ५ ऑगस्टला जाहीर केलेल्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील श्रीमंतांच्या यादीत शंभर व्यक्तींपैकी जवळजवळ ५१ व्यक्ती या अमेरिकेतील आहेत, तर ३३ व्यक्ती या आशियातील आणि ८ युरोपमधील आहेत. या शंभर व्यक्तींची एकूण संपत्ती ८४२.९ अब्ज डॉलर इतकी असल्याचे या यादीत म्हटले आहे. यामध्ये बिल गेट्स यांची संपत्ती ७९.६ अब्ज डॉलर इतकी आहे, तर त्यांच्यापाठोपाठ ओरॅकलचे संस्थापक लॅरी इल्लीसन यांचा नंबर असून त्यांची संपत्ती ५० अब्ज डॉलर इतकी आहे. तिस-या नंबरवर अमॅझोनचे जेफ्फी बेझोस असून त्यांची संपत्ती ४७.८ अब्ज डॉलर आहे. सोशल मिडियात सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या फेसबुक या संकेतस्थळाचे सहसंस्थापक मार्क झुकरबर्गसुद्धा चौथ्या क्रमांकार आहेत. मार्क झुकरबर्गची संपत्ती ४१.२ अब्ज डॉलर आहे. यानंतर या यादीत गुगलचे लॅरी पेज आणि सर्गेई ब्रिन आणि अलीबाबाचे अध्यक्ष जॅक मा यांचाही समावेश आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसापूर्वी फोर्ब्जने सर्वाधिक श्रीमंत दाम्पत्य म्हणून बिल गेट्स व त्यांच्या पत्नी मेलिंडा यांचे नाव जाहीर केले होते.