नोटांद्वारे कोरोना व्हायरस पसरण्याचा धोका? बँकेच्या संशोधनात मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2020 11:36 AM2020-11-25T11:36:42+5:302020-11-25T11:39:42+5:30

CoronaVirus currency : मास्क, सॅनिटायझर आदी गोष्टी हवेतील, हातावरील व्हायरस नाकात जाण्यापासून रोखू शकतात परंतू तो व्हायरस मुळापासून नष्ट करू शकत नाहीत. यामुळे वस्तूंवर बसलेला कोरोना व्हायरस वेळीच नष्ट करणे खूप गरजेचे ठरणार आहे.

Risk of spreading corona virus through notes? Big revelation in bank research | नोटांद्वारे कोरोना व्हायरस पसरण्याचा धोका? बँकेच्या संशोधनात मोठा खुलासा

नोटांद्वारे कोरोना व्हायरस पसरण्याचा धोका? बँकेच्या संशोधनात मोठा खुलासा

Next

जगभरात कोरोनाची दुसरी, तिसरी लाट सुरु झाली आहे. आता पुन्हा एकदा कोरोना व्हायरस वेगाने पसरू लागला असून रुग्णांची संख्या कमालीची वाढू लागली आहे. यामुळे केंद्र सरकार, राज्य सरकार सावधगिरी बाळगण्याचे आवाहन लोकांना करत आहेत. हिवाळ्याचे दिवस असून थंडी आणि प्रदूषणामुळे कोरोना व्हायरसचे संक्रमण वाढू लागले आहे. अशातच नोटांच्या वापरातून कोरोना पसरतो का? याबाबत मोठा खुलासा समोर आला आहे. 


ब्लूमबर्गच्या एका रिपोर्टनुसार नोटांच्या वापरातून कोरोना व्हायरस पसरण्याचा धोका खूप कमी आहे. बँक ऑफ इंग्लंडने केलेल्या एका संशोधनानुसार चलनी नोटांद्वारे कोरोना व्हायरसचे संक्रमण होण्याची जोखिम खूम कमी आहे. 

कोरोनाची लागण झालेला व्यक्ती जेव्हा नोटेवर शिंकतो, त्याच्या तासाभरानंतर नोटेवर चिकटलेला कोरोना व्हायरस प्रभावहीन व्हायला लागतो. सहा तासांनंतर कोरोना व्हायरसचा प्रभाव हा 5 टक्के किंवा त्याहूनही कमी झालेला असतो. नोटांद्वारे कोरोना व्हायरसचे संक्रमण होण्याचा धोका कमी आहे. कारण या नोटा साधारण परिस्थितीतही पर्समध्ये सुरक्षित ठेवल्या जातात. यामुळे कोरोना संक्रमित व्य़क्ती या नोटांना हात लावण्याची शक्यता खूप कमी असते. 


रिपोर्टमध्ये नोटांवर अन्य़ वस्तूंच्या तुलनेत कोरोनाचे अस्तित्व खूप कमी प्रमाणात आढळत असल्याचे दिसून आल्याचे म्हटले आहे. 


प्लाझ्मा स्प्रे! 30 सेकंदांत कोरोनाचे काम तमाम
मास्क, सॅनिटायझर आदी गोष्टी हवेतील, हातावरील व्हायरस नाकात जाण्यापासून रोखू शकतात परंतू तो व्हायरस मुळापासून नष्ट करू शकत नाहीत. यामुळे वस्तूंवर बसलेला कोरोना व्हायरस वेळीच नष्ट करणे खूप गरजेचे ठरणार आहे. एका नवीन संशोधनानुसार प्लाझ्माचा स्प्रे धातू, चामडे आणि प्लॅस्टिकच्या पृष्ठभागाला चिकटलेला कोरोनाव्हायरस अवघ्या 30 सेकंदांत मारू शकतो. हे संशोधन कोरोनाच्या लढाईत मोठी भूमिका निभावण्याची आशा निर्माण झाली आहे. प्लाझ्मा हा पदार्थाच्या चार महत्वाच्या अवस्थांपैकी एक आहे. हा प्लाझ्मा स्थिर गॅसवर गरम करून किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटीक फील्डच्या संपर्कात आणत बनविता येणार आहे. हे संशोधन फिजिक्स ऑफ फ्लूड्स नावाच्या जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहे. जूनमध्ये हे संशोधन करण्यात आले आहे. यामध्ये कोल्ड प्लाझ्माचा उपयोग धातू, चामडे आणि प्लास्टिकसारख्या वस्तूंवर करण्यात आले. यावर बसलेले कोरोना व्हायरससारखे असंख्य विषाणू काही सेकंदांत नष्ट झाल्याचे दिसून आहे.

Web Title: Risk of spreading corona virus through notes? Big revelation in bank research

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.