पाकिस्तानी अण्वस्त्रांच्या चोरीचा धोका वाढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2016 03:28 AM2016-03-23T03:28:58+5:302016-03-23T03:28:58+5:30
पाकिस्तानने गैरसामरिक अण्वस्त्रांवर आपले लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे या देशातील अण्वस्त्रांच्या चोरीचा धोका वाढला आहे, असा इशारा अमेरिकेच्या खासगी संघटनेने दिला आहे.
वॉशिंग्टन : पाकिस्तानने गैरसामरिक अण्वस्त्रांवर आपले लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे या देशातील अण्वस्त्रांच्या चोरीचा धोका वाढला आहे, असा इशारा अमेरिकेच्या खासगी संघटनेने दिला आहे.
अमेरिकी थिंक टँकर ‘हार्वड केनेडी स्कूल’तर्फे हा अहवाल जारी करण्यात आला आहे. ‘प्रिव्हेंटिंग न्यूक्लिअर टेररिझम : कंटीन्यूअस इम्प्रूव्हमेंट आॅर डेंजरस डिक्लाईन?’ या शीर्षकाचा हा अहवाल आहे.
त्यात म्हटले आहे की, पाकिस्तानच्या अण्वस्त्रांचा विस्तार होत असून तो देश गैरसामरिक अण्वस्त्रांकडे वळत आहे. त्यामुळे अण्वस्त्रांच्या चोरीचा धोका वाढला आहे. प्रतिकूल परिस्थिती वाटत आहे. दीर्घकालीन विचार करता अण्वस्त्रांवर अतिरेकी कब्जा करण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र इतक्यात तरी शक्य नाही.अमेरिकेच्या एका ज्येष्ठ मुत्सद्याने आठवड्यापूर्वीच अशा प्रक ारची चिंता व्यक्त केली होती. त्या पाठोपाठ त्या विषयावर हा अहवाल आला आहे. अमेरिकेच्या विदेश विभागातील शस्त्र नियंत्रण आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षाविषयक अव्वर सचिव राईज-ई-गोट्टेमोरालर यांनी गुरुवारी काँग्रेसमधील चर्चेत सिनेटच्या विदेशसंबंधी सदस्यांसमोर पाकिस्तानच्या अण्वस्त्रांबाबत चिंता व्यक्त केली होती. विध्वंसकतेमुळे गैरसामरिक अण्वस्त्रांचा धोका वाढला आहे. या अहवालात म्हटले आहे की, पाकिस्तानातील अण्वस्त्र साठा वेगाने वाढत चालला आहे. तेथील भ्रष्टाचार वेगाने वाढत असून अतिरेकीसमर्थक वातावरण पाहता अशा अण्वस्त्रांच्या संरक्षणासाठी पुरेशा उपाययोजना आवश्यक आहेत. (वृत्तसंस्था)