जर्मनीत चर्चमध्ये आशीर्वाद देणारा रोबोट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2017 01:08 AM2017-06-03T01:08:59+5:302017-06-03T01:08:59+5:30
चर्चमध्ये प्रार्थना म्हणणे, बायबलचे वाचन आणि आशीर्वाद देणे ही कामे धर्मगुरू (प्रिस्ट) करतात. मंदिरात
चर्चमध्ये प्रार्थना म्हणणे, बायबलचे वाचन आणि आशीर्वाद देणे ही कामे धर्मगुरू (प्रिस्ट) करतात. मंदिरात पुजाऱ्याचे जे स्थान असते तेच धर्मगुरुंचे चर्चमध्ये. आता मात्र धर्मगुरूंची जागा रोबोट घेणार, असे दिसते. जर्मनीत चर्चमध्ये वरील कामे धर्मगुरू नव्हे तर रोबोट करतात. ब्लेस यू-२ नावाचा हा रोबोट हातांनी आशीर्वाद देतो व त्यावेळी हातातून प्रकाशही बाहेर पडतो. हा रोबोट विटेनबर्गमध्ये बसवण्यात आला आहे. जर्मन धर्मगुरू मार्टिन ल्यूथर की द नाइंटी फाइव्ह थिसीसच्या प्रकाशनाला ५०० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल हा रोबोट आणण्यात आला आहे. चर्चने दिलेल्या माहितीनुसार आशीर्वाद द्यायच्या आधी रोबोट त्या व्यक्तीला आशीर्वाद पुरुषाच्या आवाजात हवा की महिलेच्या, असे विचारतो. याशिवाय आशीर्वाद कशा प्रकारचा हवा असेही तो विचारतो. व्यक्ती जशी इच्छा व्यक्त करते त्याप्रमाणे रोबोट हसतहसत हात पसरवून आशीर्वाद देतो. रोबोट बायबलमधील मजकूरही वाचून दाखवतो ईश्वर तुम्हाला आशीर्वाद देवो आणि तुमचे रक्षण करो.