रोबोट देत होता शिक्षण, विद्यार्थ्यांना समजलेच नाही
By admin | Published: May 12, 2017 12:49 AM2017-05-12T00:49:47+5:302017-05-12T00:49:47+5:30
प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यात शिक्षकाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. शिक्षकामुळेच विद्यार्थी घडतो आणि विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा मिळते
प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यात शिक्षकाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. शिक्षकामुळेच विद्यार्थी घडतो आणि विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा मिळते; पण आपल्याला कोण शिक्षण देत आहे याची माहितीच विद्यार्थ्यांना नसते, असे कधी होते का? होय, असे झाले आहे. आजकाल शिक्षणात मोठे बदल झाले आहेत. मोठ्या शाळांत ब्लॅक बोर्डाच्या जागी स्मार्ट क्लास आले आहेत. अनेक विद्यापीठे आॅनलाईन क्लासही घेतात. डिस्टंस एज्युकेशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांची या माध्यमातून सोय होते. शिकविणारे शिक्षक हे समोरच्या स्क्रीनवर दिसतात. भारतीय प्रोफेसर अशोक गोयल यांनी मात्र नवाच प्रयोग केला. ते एक आॅनलाईन कोर्स चालवितात. ते कॉम्युटर सायन्सचे प्रोफेसर आहेत. त्यांचे विद्यार्थी एवढे प्रश्न करीत होते की, या सर्वांना उत्तरे देणे अशक्य होते. या विद्यार्थ्यांना उत्तरे देण्यासाठी त्यांनी एक प्रोग्राम बनविला. हा रोबोट शिक्षकासारखे संभाषण करतो. २०१५ मध्ये त्यांनी वॉटसन नामक असिस्टंट तयार केला. अवघडातील अवघड प्रश्नाचे उत्तरे हा रोबोट देतो. अनेक दिवस विद्यार्थ्यांना लक्षातच आले नाही की, उत्तरे कोण देत आहे. शेवटच्या सेमिस्टरमध्ये काही जणांना ही बाब लक्षात आली. हा प्रोग्राम तयार करणे म्हणजे रोबोटला मानवी बुद्धी देण्यासारखे हे काम असल्याचे ते सांगतात.