भारताने बांधलेल्या अफगाणिस्तानच्या संसदेवर रॉकेट हल्ला
By admin | Published: March 28, 2016 12:24 PM2016-03-28T12:24:11+5:302016-03-28T12:55:55+5:30
भारताने बांधलेल्या अफगाणिस्तान संसदेच्या नव्या इमारतीवर सोमवारी रॉकेट डागण्यात आले. सुरक्षा अधिकारी अफगाणिस्तान संसदेमध्ये प्रवेश करत असताना हा रॉकेट हल्ला करण्यात आला.
Next
ऑनलाइन लोकमत
काबूल, दि. २८ - भारताने बांधलेल्या अफगाणिस्तान संसदेच्या नव्या इमारतीवर सोमवारी रॉकेट डागण्यात आले. सुरक्षा अधिकारी अफगाणिस्तान संसदेमध्ये प्रवेश करत असताना हा रॉकेट हल्ला करण्यात आला. अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये ही संसद इमारत आहे.
सकाळी १०.१५ च्या सुमारास अफगाण संसदेच्या इमारतीजवळ तीन रॉकेट डागण्यात आली. यावेळी स्फोटाचे मोठे आवाज झाले असे अफगाणी प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे. प्राथमिक माहितीनुसार या हल्ल्यात कोणतीही जिवीतहानी झाली नसल्याचे वृत्त आहे.
अफगाण संसदेच्या कनिष्ठ सभागृहाच्या सदस्यांची बैठक सुरु असताना हा रॉकेट हल्ला झाला. अद्यापपर्यंत कोणत्याही संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही.
अफगाणिस्तानला संसदेची नवी इमारत बांधून देण्यात भारताने निधीसह अन्य मदत मोठया प्रमाणावर केली आहे. मागच्यावर्षी डिसेंबर महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या इमारतीचे उदघाटन झाले होते. तिथून परतताना त्यांनी अचानक पाकिस्तानला धावती भेट दिली होती.