केरळमधील नर्सचा मुलासह लिबियामध्ये रॉकेट हल्ल्यात झाला मृत्यू

By admin | Published: March 26, 2016 04:26 PM2016-03-26T16:26:06+5:302016-03-26T16:32:06+5:30

मूळच्या केरळमधील असणारी एक नर्स व तिच्या दीड वर्षांच्या मुलाचा लिबियामध्ये रॉकेट हल्ल्यात मृत्यू झाला.

In a rocket attack in Libya with a nurses child in Kerala, | केरळमधील नर्सचा मुलासह लिबियामध्ये रॉकेट हल्ल्यात झाला मृत्यू

केरळमधील नर्सचा मुलासह लिबियामध्ये रॉकेट हल्ल्यात झाला मृत्यू

Next
ऑनलाइन लोकमत
कोची, दि. २६ - मूळच्या केरळमधील असणारी एक नर्स व तिच्या दीड वर्षांच्या मुलाचा लिबियामध्ये रॉकेट हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना घडली.
२५ मार्च रोजी रात्रीच्या सुमारास झावैया येथे ही घटना घडली. सुनू सत्यम व प्रणव असे त्या दोघांचे नाव असून एक रॉकेट त्यांच्या घरात घुसून झालेल्या स्फोटात ते मृत्यूमुखी पडले. त्यावेळी सुनू यांचे पती विपिन कुमार कामावर गेले असल्याने ते बचावले.
सुनू सत्यम या झावैया मेडिकल सेंटरमध्ये काम करत होत्या. या हल्ल्यात इतर काही जण मृत्यूमुखी पडल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान केरळचे मुख्यमंत्री ओमेन चंडी यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. 
आपण याप्रकरणाची संपूर्ण माहिती मागवली असून सुनू यांच्या पतीशी संपर्कात असल्याचे परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी ट्विटरवरून नमूद केले.

Web Title: In a rocket attack in Libya with a nurses child in Kerala,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.