रुग्णालयावर रॉकेट हल्ला, ५०० बळी, जबाबदार कोण? बायडेन यांनी नेतन्याहूंसमोर स्पष्टच सांगितलं
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2023 05:00 PM2023-10-18T17:00:51+5:302023-10-18T17:01:50+5:30
JoeBiden In Israel: इस्राइल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धादरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन हे इस्राइलच्या दौऱ्यावर आले आहेत. या दौऱ्यादरम्यान, जो बायडेम यांनी मोठं विधान केलं आहे.
इस्राइल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धादरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन हे इस्राइलच्या दौऱ्यावर आले आहेत. या दौऱ्यादरम्यान, जो बायडेम यांनी मोठं विधान केलं आहे. बायडेन यांनी सांगितले की, गाझामधील रुग्णालयात झालेल्या स्फोटामध्ये इस्राइलचा हात आहे, असं वाटत नाही. या हल्ल्यामागे कुठलातरी दुसरा गट आहे.
तेल अवीव येथे पोहोचलेल्या जो बायडेन यांनी इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्यासोबत संयुक्त पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी सांगितले की, काल गाझामध्ये जो स्फोट झाला, त्यामुळे मी खूप दु:खी आहे. मात्र आम्ही आतापर्यंत जे काही पाहिले आहे, त्यामधून हा हल्ला इस्राइलने केला आसावा असं वाटत नाही.
बायडेन यांनी नेतन्याहू यांना सांगितले की, अल अहली बॅप्टिस्ट रुग्णालयावर बॉम्बफेक तुम्ही नाही तर दुसऱ्या गटाने (हमास) केला आहे. मात्र याबाबत इस्राइलचे पंतप्रधान नेतन्याहू आणि बायडेन यांनी कुठलाही पुरावा दिलेला नाही. या रॉकेट हल्ल्यामध्ये ५०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, बायडेन यांनी पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांना असं सांगत आपल्या बोलण्यास सुरुवात केली की, मी आज इथे एका सर्वसाधारण कारणामुळे येऊ इच्छित होतो. आजच्या घडीला अमेरिका कुठे उभी आहे हे इस्राइल आणि जगभरातील लोकांना कळावं, अशी माझी इच्छा आहे. हे मी वैयक्तिकरीत्या इथे येऊन स्पष्ट करू इच्छित होतो.