अमेरिकी दूतावासावर रॉकेट हल्ला, मशिदीवर लाल झेंडा फडकावून इराणकडून युद्धाची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2020 12:33 AM2020-01-05T00:33:34+5:302020-01-05T00:37:24+5:30
इराकमधल्या अमेरिकी दूतावासावर रॉकेटचा मोठा हल्ला करण्यात आला आहे.
इराकः इराकमधल्या अमेरिकी दूतावासावर रॉकेटचा मोठा हल्ला करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राजधानी बगदादमध्ये अमेरिकी दूतावासात रॉकेट डागण्यात आलं आहे. या हल्ल्यामुळे इराकमध्ये खळबळ उडाली. स्थानिक सुरक्षा सूत्रांच्या माहितीनुसार, इराकची राजधानी बगदादमधल्या ग्रीन झोनमध्ये अमेरिकी दूतावासात एका रॉकेटचा स्फोट झाला. बगदादमधल्या ग्रीन झोनमधल्या अमेरिकी दूतावासाच्या आत कत्युषा रॉकेटनं हल्ला करण्यात आला. परंतु या हल्ल्यात किती नुकसान झालं हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. या हल्ल्यानंतर बगदादच्या आकाशात अमेरिकेची विमानं घिरट्या घालताना दिसत होती. इराक स्थित बलाद एअरफोर्सवरही दोन रॉकेट डागण्यात आली आहेत. अमेरिकी सैनिकांची तिकडेसुद्धा छावणी होती. विशेष म्हणजे इराणचा टॉप कमांडर जनरल कासीम सुलेमानी याला एअर स्ट्राइकमध्ये ठार करण्यात आल्यानंतर बगदादमधल्या अमेरिकेवरील दूतावासावर हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात 8 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
Two rockets hit Iraq base where US troops deployed, security sources say: AFP News Agency https://t.co/1dwvBM9e1y
— ANI (@ANI) January 4, 2020
दुसरीकडे शनिवारी इराणनं मशिदीवर लाल झेंडा फडकावून युद्धासाठी तयार असल्याचा इशारा दिला आहे. अशा परिस्थितीत झेंडा फडकावण्याचा अर्थ म्हणजे युद्धासाठीची ती पूर्वतयारी असते. रिपोर्टनुसार, इराणनं अशा प्रकारे पहिल्यांदा मशिदीवर लाल रंगाचा झेंडा फडकावून युद्धाची घोषणा केली आहे.
Two missiles hit Green Zone in Baghdad, the capital of Iraq, reports AFP News Agency
— ANI (@ANI) January 4, 2020